कुलभूषण जाधव प्रकरण; पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय न्यायालयात स्पष्टीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |



इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ४०० पानाचे स्पष्टीकरण सादर केले आहे. भारतासाठी नेमण्यात आलेले परराष्ट्र विभागाचे महासंचालक डॉ. फरीहा बुगती यांनी हे स्पष्टीकरण सादर केल्याची माहिती पाकिस्तानी विदेश विभागाचे प्रवक्ता डॉ. मोहम्मद फैजल यांनी दिली.

 

हेरगिरी, घातपाती कारवाया करणे व बॉम्बस्फोट घडविणे या आरोपांखाली जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर २३ जानेवारी रोजी न्यायालयाने दोन्ही देशांना आपली बाजू मांडण्यास मुदत दिली होती. त्यानुसार भारताने १७ एप्रिल रोजी आपली बाजू मांडली होती. यावर पाकिस्तानला आपली १७ जुलै पर्यंत बाजू मांडण्याची मुदत न्यायालयाने दिली होती.

@@AUTHORINFO_V1@@