दूध दरवाढ आंदोलन : तिसऱ्या दिवशी देखील आंदोलनाला हिंसक वळण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |

कोल्हापुरात गोकुळचा टँकर पेटवला; सांगलीतही टँकरची तोडफोड 




कोल्हापूर : दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून स्भाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या दरवाढ आंदोलनाला आज तिसऱ्या दिवशी देखील हिंसक वळण प्राप्त झाले आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी देखील स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध घेऊन जाणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड केली असून कोल्हापुरात दूध घेऊन जाणाऱ्या एक टँकर पेटल्याची घटना घडली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणून सुरु करण्यात आलेले हे आंदोलन खरचं शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच केले जात आहे का ? असा प्रश्न या हिंसेमुळे निर्माण झाला आहे.


काल मध्यरात्री कोल्हापूराहून मुंबई-पुण्याच्या दिशेने जात असलेल्या गोकुळ डेअरीचा टाटा ४०७ हा टँकर स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रस्त्यात अडवला. तसेच टँकर चालकाला दमदाटी करून टँकरमधून बाहेर उतरण्यास सांगितले व त्यानंतर दूधरत्यावर ओतून देत, टँकरला आग लावली. तसेच सांगलीमध्ये देखील दुधाची वाहतूक करणाऱ्या एका टँकरवर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. यामध्ये टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टँकर चालकाला देखील किरकोळ जखमा झाल्या आहेत.


मुंबई-पुण्यातील दुधाची आवाक घटली

दरम्यान स्वाभिमानीच्या या आंदोलनाचे परिणाम आता पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांवर जाणवू लागले आहे. स्वभिमानीने मोठ्या शहरांकडे दुध जाऊ देण्याच्या इशारानंतर आता मुंबई-पुणे आणि ठाणेमधील दुधाची अवाक घटल्याची समोर आले आहे. शहरांमध्ये अद्याप सर्वाना पुरेल इतके दूध साठा उपलब्ध आहे. परंतु आवाक घटल्यामुळे नागरिकांसमोर चिंतेचा विषय निर्माण झाला आहे..



सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, यामागणी स्वाभिमानीने गेल्या सोमवारपासून राज्यभर दरवाढ आंदोलनाला सुरुवात केली आहे. स्वभिमानीने या आंदोलनाला सामान्य शेतकऱ्यांचे जरी नाव दिले असले तरी आंदोलनाल पहिल्याच दिवसापासून हिंसेचे गालबोट लागले आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी लाखो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले आहे. तसेच अनेक टँकरची देखील तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे हिंसक आंदोलन करून स्वाभिमानी नेमके कोणाचे हित करत आहे, असा प्रश्न सध्या सामान्य नागरिकांना पडत आहे.
@@AUTHORINFO_V1@@