ठाण्यातील गावठाण व आगरी कोळी वसाहतींचा प्रश्न लवकरच सुटणार- मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |




ठाणे : ठाणे शहरात क्लस्टर योजनेत आगरी-कोळी, आदिवासी, गावठाण क्षेत्रातील घरांचा समावेश केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संबांधित नागरिकांच्या भावनांचा विचार करून आ. प्रताप सरनाईक यांनी पावसाळी अधिवेशनात या संदर्भात लक्षवेधी मांडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “गावठाण क्षेत्रालगतच्या क्षेत्रासहित शहरी नूतनीकरण योजनेत समावेश करण्यात आला आहे तसेच हा तिढा लवकरच सुटेल, ”असही आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ठाण्यातील समूह विकास हा ४४ विभागांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात झोपडपट्टी परिसराचा समूह विकास करण्यात येईल.

 

शास्त्रीनगर, सहकारनगर, लक्ष्मीनगर, चिरागनगर, नळपाडा, सुभाष नगर, जय भवानी नगर यांचा समावेश होणार नाही. तसेच माजिवडा गाव, वाघबीळ गाव, कासारवडवली, भाईंदरपाडा या गावठाण विभागाचा समावेश होईल. समूह विकास करून झोपडपट्टीत जीवन व्यथित करणार्‍या लोकांना दिलासा देण्याऐवजी क्लस्टरचे दोन भाग पाडून तेढ निर्माण केली आहे. आगरी व कोळी लोकांच्या जमिनी महापालिकेने विकास प्रकल्पासाठी घेतलेली असताना त्यांना योग्य मोबदला देऊन जुन्या गावठाणांना अधिकृत परवानगीही मिळावी. तसेच मुंबईप्रमाणे वाढीव चटई निर्देशांक देण्याची गरज आहे.

 

समूह विकास योजनेतील खंड ११ नुसार गावठाणातील नागरिक हे गृहनिर्माण संस्था स्थापन करून ७० टक्के भूखंडधारकांच्या सहमतीने एकत्रित विकास करू शकतात. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गावठाण क्षेत्रातील विकसन उंचीबाबत २५ मी. उंचीपर्यंत कोणतेही निर्बंध नसून त्यावरील उंचीस अग्निशमनाकरिता आवश्यक मोकळ्या जागा सोडणे आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@