उपमहापौरांनी प्रशासनाला धरले धारेवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |




खुर्चीवर न बसता जमिनीवर बसून केला निषेध

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या भाजप उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच महासभेत रस्त्यांवरील खड्डेप्रश्नावरून पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. कल्याण-डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या मुद्द्यावरून त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आणि चक्क आपल्या खुर्चीवर न बसता खाली जमिनीवर बसल्या. त्यांचा हा आवेश पाहून इतर भाजप नगरसेवक तसेच, काही शिवसेना नगरसेवकही चांगलेच आक्रमक झाले.

 

मंगळवार, दि. १७ जुलै रोजी झालेली ही उपेक्षा भोईर यांची पहिलीच महासभा होती. कल्याण-डोंबिवली शहरात खड्यांमुळे ५ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला असून दोषी अधिकार्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची भोईर यांनी महासेभेत केली. या मुद्द्यावर पुढे आपल्या खुर्चीवर न बसता त्या खाली नगरसेवकांच्या मार्गिकेमध्ये खाली जमिनीवर बसल्या. उपेक्षा भोईर यांचा पवित्रा बघून प्रशासन अधिकार्‍यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. भोईर यांनी अधिकार्यांना धारेवर धरताना खडे बोलही सुनावले. आपण मागील काही दिवसपासून प्रशासनाला खड्डे बुजविण्यासाठी वारंवार सूचना करीत आहोत, मात्र अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. या अशा ढिसाळ आणि कामचोरवृत्तीच्या अधिकार्यांमुळे जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

 

टिटवाळा येथील रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण होत नाही. निमकर नाका ते सावरकर नगर धर्मवीर आनंद दिघे मार्गाचे काम काही आडमुठ्या लोकांच्या विरोधामुळे रेंगाळले असून तो रस्ता खड्डेमय झाला झाला आहे. या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून तो रस्ता ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी यांनी यावेळी केली. खड्यांमुळे जीव गमवावा लागल्यामुळे त्या कुटुंबाचे अतोनात पारिवारिक नुकसान झाले आहे. या प्रकारणी संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशीही मागणी उपेक्षा भोईर यांनी या महासभेदरम्यान केली. भाजपचे नगरसेवकही यावेळी भोईर यांच्यासमवेत जमिनीवर बसून या आंदोलनात सहभागी झाले.

@@AUTHORINFO_V1@@