संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |

सरकार चर्चेला पूर्ण तयार ; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन




नवी दिल्ली : संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे पावसाळी अधिवेशन देशाच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून सभागृहातील सर्व सभासदांनी या अधिवेशनामध्ये सहभाग घ्यावा, तसेच देशातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने व्यापक चर्चा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्त केले आहे.

'देशामध्ये सध्या पावसाळी वातावरण असून अनेक ठिकाणी देशात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे यंदाच्या या अधिवेशनामध्ये देशातील सामान्य जनतेचे हित नजरेसमोर ठेऊन चर्चा केली गेली पाहिजे' असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी तयार असून सभागृहातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी देखील या चर्चेत सहभाग घेऊन सरकारची चर्चा करावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.





मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामधील मोदी सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असणार आहे. पुढील वर्ष देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन हे देशासह सरकारसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@