विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी पासपोर्ट शिबिराचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |
 
 

 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी पासपोर्ट शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, “पारपत्र हे प्रगतीचे दालन आहे. यामुळे परदेशातील शिक्षणाची संधी आणि रोजगाराच्या संधी यामुळे स्वीकारणे सुलभ होईल. प्रत्येक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडे पारपत्र असायला हवे. येणारी संधी ही आपल्यासाठी महत्त्वाची असते. त्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे.”
 
 
विदेश मंत्रालायातील अवर सचिव ज्ञानेश्वर मुळे आणि पुणे पारपत्र केंद्राचे अधिकारी अनंत ताकवले यांनी विद्यापीठातील प्रत्येकाकडे पारपत्र असावे, यासाठी विशेष केंद्र तात्पुरत्या स्वरूपात दिले आहे. असे प्रशासकीय सहकार्य मिळाल्याने एजंटकडे जाऊन अधिकचे द्यावे लागणारे पैसे वाचतील आणि योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित गट दिवसभर असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी तसेच, पुणे पारपत्र कार्यालयाचे अधिकारी अनंत ताकवले, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे हे उपस्थित होते.
 
 
पारपत्र अर्ज भरताना कोणतीही माहिती दडवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चुकीची माहिती भरल्यास त्यावर ५,००० रुपयांपर्यंतचा दंड आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तांत्रिक अडचणी तिथेच दूर करता येतील, अशी माहिती ताकवले यांनी दिली.
 
 
आज सुरू झालेले शिबिर पुढील दहा दिवस म्हणजेच २७ जुलैपर्यंत विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाशेजारील सभागृहात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहिल. यासाठी नाममात्र १०० रुपये शुल्क असून पारपत्राचे शुल्क अतिरिक्त असणार आहे. सर्व विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पारपत्राचे काम करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@