एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |

भारतावर इंग्लंडचा ८ गडी राखून विजय, मालिका १-२ ने खिशात 




लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने गमावली असून इंग्लंड संघाने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडचा जो रूट आणि इओन मोर्गन यांच्या अनुक्रमे शतकी आणि अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने दिलेल्या २५७ धावांचे आव्हान इंग्लंडने लीलया पार केले आहे. यामुळे ही एकदिवास्य्य मालिका १-२ अशा गुणांनी इंग्लंडने आपल्या खिशात घातली आहे.

सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार मैदानात उतलेल्या भारतीय संघांकडून कर्णधार विराट कोहली याने सर्वाधिक ७१ धावा केल्या. विराटनंतर शिखर धवन (४४), एमएस धोनी (४२) यांनी सर्वाधिक धावा केल्या. या धावांच्या बळावर ५० षटकांमध्ये भारतीय संघाने ८ बाद २५६ धावांची मजल मारली होती. याबदल्यात इंग्लंडकडून डेविड विल्यी आणि आदिल रशीद या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मार्क वूड याने १ बळी घेतला.

यानंतर मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने अत्यंत आक्रमकपणे आपल्या खेळाला सुरुवात केली होती. सुरुवातीला मैदानात आलेल्या जेम्स विन्स आणि जॉनी ब्रिस्टो यांनी अनुक्रमे २७ आणि ३० धावा करत इंग्लंडला उत्तम सुरुवात करून दिली. परंतु त्यानंतर आलेल्या जो रूटने नाबाद १०० धावांची शतकी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. तसेच यामध्ये त्याला मोर्गनने देखील ८८ धावांची उत्तम साथ देत संघाला विजय मिळवून दिला.

@@AUTHORINFO_V1@@