प्रसिद्ध अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |


मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रिटा भादुरी यांचे आज मुंबईतील येथे आजारपणामुळे निधन झाले आहे. त्या ६२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील विलेपार्ले येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असून आज दुपारी अंधेरी (पश्चिम) येथे त्यांच्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. रिटा यांच्या अशा अचानक जाण्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


गेल्या काही दिवसांपासुन रिटा यांना किडनीचा त्रास होत होता. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून विलेपार्लेतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. यावेळी उपचारादरम्यानच काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव अंधेरीतील त्यांच्या निवास्थानी आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनेक कलाकार त्यांच्या अंतिम दर्शनसाठी म्हणून त्यांच्या निवास्थानी आले होते. यानंतर अंधेरी पश्चिममध्ये आज दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.




रिटा भादुरी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५५ मध्ये लखनऊ येथे झाला होता. यानंतर १९६८ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ७० आणि ८० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. ज्यामध्ये 'साराभाई वर्सेज साराभाई', 'एक नई पहचान', 'कुमकुम', 'अमानत' अशा मालिकांचा समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@