मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 'ओव्हरफ्लो'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |


मुंबई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तुळशी, विहार, मोडकसागर या धरणांनंतर आता तानसा धरण देखील ओसंडून वाहू लागले आहे. तानसा धरणामध्ये काल रात्रीच १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तानसा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून त्यामुळे नदीच्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरु आहे. यामुळे तुळशी, विहार आणि मोडकसागर धरणे गेल्या दोन दिवसांपूर्वीच काठोकाठ भरली आहे. त्यानंतर तानसा धरणामध्ये देखील काल रात्री शंभर टक्के पाणी साठा जमा होऊन धरण ओसंडून वाहू लागले होते. त्यामुळे आज सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात असून त्यामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईमध्ये सुरु असलेल्या पावसाचा जोर आता थोड्या प्रमाणात ओसरलेला पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक ठिकाणी आता पाऊसचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होत असल्याचे दिसत आहे.
@@AUTHORINFO_V1@@