जि.प.कर्मचार्‍यांचे अंधारात कामकाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

काही विभागांनाच फक्त जनरेटरचा वीजपुरवठा
३० वर्षे जुने जनरेटरची कालमर्यादा संपली

 
नवीन जनरेटरचा सभेत ठराव होणार का?
जळगाव :
शहरात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आणि दुपारपासून पाऊस सुरु असल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. यात जिल्हा परिषदमधील वीज पुरवठा खंडीत असल्याने संपूर्ण वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी जनरेटरवर भार पडत होता. मात्र जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीतील विद्युत उपकरणे जनरेटरवर शक्य नसल्याने ठराविक विभागांमध्येच वीज पुरवठा सुरु होता. त्यामुळे जुन्या इमारतीसह नवीन इमारतीमधील आरोग्य, महिला-बालविकास, सिंचन, पाणी पुरवठा आदी विभागातील लाईट, पंख्यांसह संगणक यंत्रणा पुर्णपणे बंद होऊन कर्मचारी अंधारामध्येच टॉर्चच्या सहाय्याने दैनंदिन कामे करीत होते. ही बाब नित्याचीच झाली असल्याचेे कर्मचार्‍यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले.
 
 
कालबाह्य जनरेटर ३० वर्षे जुने
जिल्हा परिषदेच्या जुन्या आणि नवीन इमारतीला प्रत्येकी २०० केव्हीनुसार ४०० केव्ही वीजपुरवठा दररोज लागतो. मात्र यासाठी असलेली पर्यायी साधनांमध्ये जनरेटर हे केवळ ५० केव्ही क्षमतेचे आहे. जनरेटरची मर्यादा ही १५ वर्षांपर्यंत असते मात्र, याला ३० वर्षे उलटली आहे. नवीन जनरेटरसाठी सर्वसाधारण सभेत दोन वेळा प्रस्ताव ठेवण्यात आला. तर एक वेळेस तांत्रिक कारणास्तव टेंडर रद्द केले आहे. त्यामुळे या जुन्या जनरेटरवर कामकाज सुरु आहे.
 
जुन्या इमारतीतील कर्मचारी होतात फरार
जि.प.च्या जुन्या इमारतीमधील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर कार्यालयीन कर्मचारी आपले टेबल सोडून बाहेर दिसेनासे (फरार) होतात. तर शिपाई बाहेरील बाकांवर गप्पांमध्ये रंगलेले असतात. त्यामुळे बाहेरुन कामांसाठी येणार्‍या नागरिकांना कर्मचारी जागेवर नसल्याने माघारी परतावे लागते. जुन्या इमारतीत ही बाब नित्याची झाली असून येथील वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कामांमध्ये गती येवून जिल्ह्यातील नागरिकांना कामे झाल्यास दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@