सरकार पैसे देेतेय, अधिकारी पळवून नेतेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई मिळावी
खा.ए.टी.पाटलांचा घणाघाती आरोप

 
 
अधिकार्‍यांचा चुकांमुळे शेतकरी वंचित, जिल्हाधिकार्‍यांशी साधला संवाद
कामचुकार अधिकार्‍यांच्या बडतर्फीची मागणी
पारोळा :
तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी भरपाई ७ कोटी रु. मंजूर झाली असून अधिकारी त्यात दिरंगाई करत आहे. केवळ अधिकार्‍याच्या बेपर्वाईमुळे, चुकांमुळे या शेतकर्‍यांना अनुदान वाटपास दिरंगाई होत आहे, असा आरोप खासदार ए.टी.नाना पाटील यांनी केला आहे. ‘शासन देतेय मात्र अधिकारी लपवून ठेवतेय’ अशा आशयाचा घणाघाती आरोपही खा.पाटील यांनी केला आहे.
 
 
खा.पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधून कामचुकार आधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी केली विविध प्रश्नांची सरबत्ती करून संबंधित अधिकार्‍यांना कसूरवार ठरवत त्यांनी अप्रत्यक्ष चांगलीच कानउघाडणी केली आहे. तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रथमच मोठी मदत प्राप्त झाली आहे. कापसावर पडलेल्या बोंडअळीने शेतकर्‍यांना जिरायती व बागायती अशा दोन विभागात शासन निर्देशानुसार मदत दिली जाईल. तालुक्यातील कापूस उत्पादकांसाठी एकूण १०० कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे.पहिला हप्ता सात कोटी रुपये तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र हे पैसे येण्यास जवळपास एक महिना झाला तरी लोटला अदा झालेला नाही, वाटपास दिरंगाई होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष करण पवार, तहसीलदार वंदना खरमाळे, नायब तहसिलदार एन. झेड. वंजारी,जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे, तालुका कृषी अधिकारी एस पी तवर, शहाराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते धीरज महाजन, भावडू राजपूत आदी उपस्थित होते.
 
 
अशी मिळणार मदत
पारोळा तालुक्यात कृषी सहायक तसेच महसूल विभागाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे कापूस पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना मदत देण्याबाबत तहसीलदार वंदना खरमाळे यांच्याकडे याद्या लवकरात लवकर द्यावयाच्या आहेत. याद्या आल्यानंतर त्या ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करणार आहेत.जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जिरायती क्षेत्राला हेक्टरी सहा हजार ८०० रुपये, तर बागायती क्षेत्रात १३ हजार ५०० रुपयाची मदत दिली जाणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टरी मदत दिली जाणार आहे. शेतकर्‍यांचा खरीप २०१७ मध्ये सातबार्‍यावर कापूस नोंद असणे तसेच बागायती व जिरायती असा उल्लेख असणे आवश्यक आहे. बाधित शेतकर्‍याच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे.
 
 
जळगाव जिल्ह्यात ४४३ कोटी १९ लाख रु. मंजूर
जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यात ४४३ कोटी १९ लाख ४७ हजार रुपये रक्कम मंजूर असून, पहिला हप्ता जिह्याला ११८ कोटी १९ लाख अनुदान प्राप्त झाले असल्याचे सांगितले. बोंडअळीच्या नुकसानीनंतर मदतीची रक्कम प्रशासनाकडे आलेली आहे. परंतु अनेक शेतकर्‍यांची बँक खाती नंबर प्रशासनाकडे नाहीत. परिणामी अनुदान वाटपाचे काम रखडले आहे. यात ज्या शेतक यांनी बँक खाती क्रमांक दिलेले आहेत, त्यांनाही अनुदान मदत मिळालेली नाही. किमान त्यांना तरी मदत तातडीने द्यावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@