दुसर्‍या दिवशीही सुरत पॅसेंजर भुसावळला गेलीच नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

अपडाऊन करणार्‍या प्रवाशांचे हाल, संताप व्यक्त

 
 
जळगाव, १७ जुलै :
सुरत रेल्वे स्थानकातून निघालेली गाडी क्र. ५९०१३ सुरत-भुसावळ ही गाडी १७ जुलै रोजीसुध्दा भुसावळ स्थानकात न पोहचल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. सलग दुसर्‍या दिवशी हा प्रकार घडल्याने अप-डाउन करणार्‍या प्रवाशंाचे हाल झाल्याने त्यांचा संताप दिसून येत होता.
 
 
भुसावळ, भादली आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर काम करण्यासाठी ७ जुलै रोजी ५ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर सुध्दा काम प्रलंबित राहिल्याने डाऊन दिशेचे काम करण्यासाठी जसा वेळ उपलब्ध होतो तसा ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून सांगण्यात आले. सध्या पावसाळा असल्याने आणि अनेक गाडया उशिराने धावत आहे. त्यामुळे सकाळची सुरत-भुसावळ पॅसेंजर जळगाव स्थानकातून भुसावळ स्थानकाकडे जाणारी गाडी जळगाव स्थानकावरच थांबविण्यात येत आहे. ही गाडी थांबविल्याने सुमारे ३ तासांपेक्षा अधिक वेळ डाऊन दिशेला जाणार्‍या गाडया नसल्याने ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अजून किती दिवस ही गाडी भुसावळ स्थानकापर्यंत जाणार नाही यावर वेळे नुसार ब्लॉक ठरत असल्याने आताच सांगता येणार नसल्याचे कारण त्यांनी दिले.
 
 
प्रवाशांचे हाल, शटलसाठी मांडले ठाण
सुरत-भुसावळ पॅसेंजर जळगाव स्थानकावर आल्यानंतर ही गाडी भुसावळ स्थानकापर्यंत जाणार नसल्याचे जाहिर करण्यात आले. त्यामुळे चाकरमानी आणि भुसावळपर्यंत जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशंानी बसने भुसावळ गाठले तर काही प्रवशांनी देवळाली-नाशिक शटलने भुसावळ गाठण्यासाठी रेल्वे स्थानकावरच ठाण मांडले.
@@AUTHORINFO_V1@@