शिवसेनेचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहचवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

शिवसेनेच्या बैठकीत निर्धार

जळगावः
मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरविलेले आहे. शिवसेनेचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी, १५ रोजी झाली.
 
 
यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, ना. गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. चिमणआबा पाटील, आ. किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, विष्णु भंगाळे, शामकांत सोनवणे, दिनेश जगताप, महिला आघाडीच्या प्रमुख महानंदाताई पाटील हे उपस्थित होते.
 
 
व्यक्तिगत भेटीगाठीला प्राधान्य देत प्रचारावर भर देण्यासाठी वेगवेगळ्या प्रभागात घरोघरी जावून प्रचार करण्याची रणनिती ठरविण्यात आली. प्रचाराचे मुद्दे काय असतील, शहराचा सर्वांगिण विकास कसा साधणार आहोत अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा झाली. कॉर्नर मिटींग घेण्यावर भर देण्यात आला.
 
 
७५ उमेदवार हे निवडून आणण्यासाठीच दिलेले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची परिस्थिती उत्तम आहे. त्यासोबतच ज्या उमेदवारांना बळ देण्याची गरज आहे तेथे कार्यकर्त्यांनी जावून त्यांना बळ द्यावे. सुसंवाद साधत असतांना कोणतीही टिका टिप्पणी न करता, सामाजिक सुरक्षेची जाणीव ठेवून चाकोरीबद्ध प्रचार कसा करावा, आपली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवावी. याविषयी सविस्तर चर्चा झाली. बुथ मॅनेजमेंट या विषयी कार्यकर्त्यांच्या नियोजना संदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकांसमोर आपण केलेले सद्यस्थितीतील वास्तविक कामे असल्यामुळे फक्त कॉर्नर मिटींगवर जास्त भर देण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर पदाधिकार्‍यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे.
 
 
संजय सावंत १९ ला शहरात
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय सावंत हे गुरूवार, १९ रोजी शहरात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन केलेले आहे. उपस्थितीचे आवाहन केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@