‘निदा खान’ला वाळीत टाकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |



बरेली : सातत्याने इस्लामविरोधात आवाज उठविणार्‍या निदा खान या महिलेला मुस्लीम समाजाने वाळीत टाकावे असा फतवा उत्तर प्रदेशच्या बरेली येथील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम या धर्मगुरूने जारी केला आहे.

 

“निदा खान सतत इस्लामविरोधात बोलत असते. त्यामुळे उद्या ती आजारी पडली तरी कोणी तिला औषधे देऊ नयेत. मृत्यूनंतरही तिच्यासाठी कोणी नमाज पठण करू नये, तसेच तिच्या जनाजाला कोणीही जाऊ नये. निदाला मृत्यूनंतर मुस्लीम दफनभूमीत जागा देऊ नये,” असे इमाम आलम याने फतव्यात म्हटले आहे.

 

“जो कोणी निदाला मदत करेल त्यालाही तीच शिक्षा सुनावली जाईल,” असे या फतव्यात म्हटले आहे. निदा खानला २०१६ मध्ये पती उस्मान रझा खानने तिहेरी तलाक दिला होता. त्यानंतर निदाने एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून निदा खान निकाह हलाला, तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व या प्रथांचे बळी ठरलेल्या महिलांना मदत करते. ”निदा तिची इस्लामविरोधी भूमिका सोडून माफी मागत नाही तोपर्यंत कोणीही तिच्याशी संपर्क ठेऊ नये,” असे या धर्मगुरूने फतव्यात म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@