मनसेनी केली मंत्रालयाबाहेरील रस्त्याची तोडफोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ मनसेची आक्रमक भूमिका




मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या झालेल्या दुराव्स्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांकडे सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी काल मध्यरात्री मुंबईतील कार्यालयाबाहेर जाऊन तोडफोड केली असून मंत्रालयाबाहेर रस्ता मनसे कार्यकर्त्यांनी फोडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर वायरल होऊ लागला असून यामुळे सरकार आता तरी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मनसेचे जवळपास १५-२० कार्यकर्ते कुदळींसह मुंबईतील मंत्रालयाबाहेर आले होते. यानंतर त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचा निषेध करत, मंत्रालयाबाहेर असलेले पेव्हर ब्लॉकची हातातील कुदळींच्या सहाय्याने तोडफोड करत, त्याठिकाणी खड्डे तयार केले. सोशल मिडीयावर वायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देखील ही घटना आहे तशी कैद झाली आहे.





दरम्यान काल देखील मनसेने तुर्भे येथे देखील मनसे सैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. परंतु वारंवार तक्रार करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी याठिकाणी येऊन तोडफोड केली होती. तसेच सरकारने याकडे लक्ष न दिल्यास मंत्रालयाची देखील तोडफोड करून असा इशारा दिला होता.
@@AUTHORINFO_V1@@