रवी शंकर प्रसाद यांचे राहुल गांधी यांना पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महिला आरक्षण विधेयकसंबधी पत्र लिहिले असून या पत्रात महिला आरक्षणसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र कार्य करेल असे म्हणण्यात आले आहे. कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिले याबद्दल रवी शंकर प्रसाद यांनी कॉंग्रेसचे आभार मानले. तसेच दोन्ही पक्ष महिला आरक्षण विधेयकासाठी मिळून कार्य करेल असे देखील ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
तिहेरी तलाक आणि निकाह हलाला या प्रथांना प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांचे आपण पालन करायला हवे. महिलांना समान हक्क आणि अधिकार मिळावे यासाठी भाजप आणि कॉंग्रेस यांनी मिळून कार्य करणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले. महिला आरक्षण विधेयकाला हिरवा कंदील दिल्याबद्दल रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले. महिलांच्या सुरक्षीततेचा आणि हक्कांचा मुद्दा आपल्या देशात महत्वाचा मानला जायला हवा यासाठी सरकार पूर्णपणे कार्य करेल असे ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@