जळगाव जनता सहकारी बँकेचा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

साहित्य वितरणासाठी वाहन रवाना

 
 
जळगाव :
जळगाव जनता सहकारी बँक सामाजिक उपक्रमात रनेहमीच अग्रेसर असते. यानुषंगाने पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकर्‍यांसाठी दैनंदिन वापराच्या साहित्याच्या वितरणासाठी आज रोजी बँकेचे वाहन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
 
 
वारीत जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून वारकरी एकत्र येऊन दिंडीत सहभागी होत असतात. यात सद्गुरू संत श्री सखाराम महाराज संस्थान,अमळनेर येथील दिंडी तसेच श्रीराम मंदिर संस्थान जळगावच्या संत मुक्ताबाई दिंडी व श्रीराम पालखी यांचा समावेश असतो. या दिंडीत सहभागी होणार्‍या वारकरी भक्तांच्या रोजच्या दिनचर्येच्या वस्तू जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे उपलब्ध करून देण्यासाठी आज रोजी सदर वस्तू वितरणासाठी बँकेचे वाहन पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. आज रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष अनिल राव, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, विभागीय अधिकारी कपिल चौबे, अधिकारी बापूसाहेब महाले आदींच्या उपस्थितीत वाहनाचे विधिवत पूजन करून वाहन वितरणासाठी रवाना झाले.
@@AUTHORINFO_V1@@