भारताने ठेवले इंग्लंडपुढे २५७ धावांचे आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
लंडन : लंडनमधील हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारताने ५० षटकांत ८ गडी गमावत २५६ धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडला विजयासाठी २५७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला होता. कर्णधार मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ सध्या खेळत आहे.
 
 
सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यात लवकरच तंबूत परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या जोडीने भारताचा डाव सावरला मात्र लवकरच शिखर धवन याला देखील माघारी परतावे लागले. शेवटच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने जोरदार फटकेबाजी करत भारताला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
 
 
इंग्लंडकडून डेव्हिड विली आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्याला मार्क वूडने १ बळी घेत चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने दिलेले आव्हान इंग्लंडचे गोलंदाज आता कसे पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या इंग्लंड ६५ धावांवर १ गडी बाद अशा स्थितीत खेळत आहे. 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@