निवडणुकीतून माघारीची अंतिम मुदत आज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

आतापर्यंत २४ उमेदवारांचे अर्ज मागे, सर्वाधिक संख्या अपक्षांची

 
 
जळगाव, १६ जुलै :
महापालिका निवडणुकीतून उमेदवारांच्या माघारीची मुदत मंगळवारी (दि.१७) संपत असून, आतापर्यंत २४ जणांनी रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती ४२७ उमेदवार रिंगणात बाकी राहिले होते. यात पक्षाचे २२६ तर अपक्ष २०१ उमेदवार होते. यात सर्वाधिक संख्या अपक्षांची आहे. उर्वरित उमेदवारांना माघार घ्यायची असल्यास मंगळवार (दि.१७) दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या भरपूर असल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी ते डोकेदुखी ठरू शकतात. अपक्ष किती मते खातील? याची धास्तीही काही उमेदवारांना आहे. त्यामुळे अपक्षांनी माघार घ्यावी, यासाठी पक्षांचे नेते प्रयत्न करीत आहेत. याशिवाय पक्षाकडून तिकीट न मिळालेल्यांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी शेवटच्या दिवशी किती अपक्ष माघार घेतील यावरच निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
 
प्रभागनिहाय माघार घेतलेले उमेदवार
१ (ड) : खान रशीदखान अमिरखान (अपक्ष), ४ (अ) : अशोक पाचू संकत (अपक्ष), ५ (ब) : रचना प्रशांत पाटील (अपक्ष), (क)  : साबेरा रहीम तडवी (अपक्ष), (ड) : राजेश अनंतराज दोशी (अपक्ष), ७ (क) : शैलेंद्र अभिमन्यू सोनवणे (अपक्ष), ९ (अ) : आशा राजेंद्र ठाकरे (अपक्ष), १० (अ) : विकास युवराज सोनवणे (अपक्ष), (ड) : जावेद रसूल खान (अपक्ष), पंकज वीरभान पाटील (अपक्ष) ११ (अ) : परवेज मोहंमद तडवी (अपक्ष), १३ (अ) : विमलबाई सुरेश अडकमोल (अपक्ष), (ब) : राजश्री बाळासाहेब चव्हाण (अपक्ष), लीलाबाई रमेश सोनवणे (अपक्ष), १४ (अ) : राजश्री बाळासाहेब चव्हाण (अपक्ष), ज्योती बाळासाहेब चव्हाण (अपक्ष), (क) : कैलास बाबूलाल मोरे (अ. भा. हिंदू महासभा), (ड) : गोपाळ गोंविदा सोनवणे (अपक्ष ), १५ (ड) : मो.नसीब दारा इक्बालउद्दीन पिरजादे (अपक्ष), १६ (अ) : स्वाती रवींद्र पाटील (अपक्ष), सुरेश सीताराम भाट (अपक्ष), (ड) : अशोक दलायदास मंधाण (अपक्ष), १८ (ड) : निजामखान मासूम खान (अपक्ष)
माजी नगरसेवक विजय वाडकर यांची भाजपा उमेदवारासाठी ५ (ड) मधून माघार
प्रभाग क्रमांक ५ ड मधून भाजपाचे माजी नगरसेवक विजय विष्णु वाडकर यांनी पक्षाचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी वरिष्ठांचा मान राखत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए. टी. नाना पाटील, जिल्हाध्यक्ष (महानगर) आ. सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, गटनेते व विद्यमान उमेदवार सुनील माळी, अनिल पगारिया, खलील पठाण, मानस शर्मा, कैलास त्रिपाठी यांच्या उपस्थितीत माघार घेतली.
 
@@AUTHORINFO_V1@@