आ. सुरेश भोळेंच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग ७ मधील उमेदवारांचा प्रचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

सीमा भोळे, दीपमाला काळे, डॉ. अश्विन सोनवणे, प्रा. सचिन पाटील आहेत रिंगणात

 
जळगाव :
प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपा आणि आरपीआय आठवले गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत आशाबाबानगर मंदिर येथून करण्यात आला.
 
 
उमेदवार सीमा भोळे, दीपमाला काळे, डॉ. अश्विन सोनवणे, प्रा. सचिन पाटील यांनी मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे यासारख्या किमान सुविधा महापालिकेतील सत्ताधार्‍यांकडून मिळत नसल्याबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. भाजपाकडून विकासकामांची अपेक्षाही व्यक्त केली. याप्रसंगी बबलू देशमुख, नीलेश शेंडे, उदय पाटील, वैभव चौधरी, विलास कोळी, गोकुळ महाजन, चंदन कोळी, बाळकृष्ण देवरे, रिंकू चौधरी, किरण अडकमोल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
एकदा भाजपाला संधी द्या :आ. भोळे
मतदारांशी संवाद साधताना आ. सुरेश भोळे म्हणाले की, विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत आपण मला हजारोंच्या मताधिक्क्याने निवडून दिले. मनपातही सत्ता स्थापनेची एक संधी भाजपाला देत प्रभाग ७ मधील पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावे. आशाबाबानगर, आरएमएस कॉलनी, रामरावनगर परिसरातील रहिवाशांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन आ. भोळे यांनी दिले.
 
प्रभाग ८ मध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ,
रस्ते, नाना-नानी पार्कसह विकासकामांचे आश्‍वासन
खोटेनगर परिसरातील सिध्दीविनायक मंदिरात विघ्नहर्ता गणरायाची पूजा करून प्रभाग क्रमांक ८ मधील प्रचाराचा शुभारंभ ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
 
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश भोळे, उमेदवार: (अ) सागर जिजाबराव पाटील, (ब) लताताई रणजित भोईटे, (क) प्रतिभा सुधीर पाटील, (ड) डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील, तसेच शिवाजीराव पाटील, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
प्रभाग क्रमांक ८ मध्ये रस्ते, भूमिगत गटारी, बगीचा, नाना-नानी पार्क, पिण्याच्या पाण्याची २४ तास सुविधा, बांभोरी पुलाचे नूतनीकरण, जुना निमखेडी रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे आश्‍वासन उमेदवारांच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व ना. गिरीश महाजन यांनी मतदारांना दिले.
@@AUTHORINFO_V1@@