न्याय हक्कांसाठी भटके-विमुक्त विकास परिषदेचा विधानभवनावर मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 नागपूर : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे १ जुलै रोजी भटक्या विमुक्त जातीजमातीतील पाच भिक्षेकऱ्यांना मुलं पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी दगड काठ्यांनी ठेचून अतिशय निघृणपणे हत्या केली. या घटनेचा भटके विमुक्त विकास परिषद तीव्र शब्दांत निषेध करत पिडीतांना न्याय मिळावा या मागणीकरीता नागपुरात काल परिषदेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला.
 
भटके विमुक्त विकास परिषदेच्या निवेदनातील प्रमुख मागण्या :

 
१. राईनपाडा घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून दयावा. पिडीत कुटुंबांचे तातडीने कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक आहे.
 
२. भटके विमुक्तांवर झालेल्या राज्यातील अन्य हल्ल्यांचीही चौकशी व्हावी.
 
३. घटनेच्या कृत्यात सहभागी असलेले गावकरी जेवढे दोषी आहेत तेवढेच दोषी सोशल मिडीया वरून अफवा पसरविणारे आणि पोलीस यंत्रणेचा काही धाक राहिलेला नाही अशी समाजमनाची धारणा करून देणारे समाज कंटक हे देखील या घटनेस कारणीभूत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून सर्व दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हावे.
 
४. शासनाने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन भटकेविमुक्त जातीजमातींची भटकंती थांबवून त्यांना स्थिरावण्याची संधी दिली पाहिजे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.

तसेच निवेदनात भटके विमुक्तांची भयंकर सद्यस्थिती व समस्या मांडून नियोजनबद्ध रितीने सर्व समस्या सोडविण्यासाठी कृती कार्यक्रम सुरु करावा आणि योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
भटके विमुक्तांच्या सर्वांगीण विकास व सामाजिक न्यायाकरीता भटके विमुक्त विकास परिषद गेले पंचवीस वर्षे विविध अंगाने कार्य करत आहे. यमगरवाडी प्रकल्प, अनसरवाडा प्रकल्प व बावन्न पालावाराच्या शाळा व स्थानिक कार्यकत्यांच्या सहाय्याने विविध उपक्रम राबवते आहे.
 

 
 
 
१५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट भटके विमुक्त पंधरवडा :
 
राईनपाडा घटनेनंतर भटक्याविमुक्तांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे व ३१ ऑगस्ट हा भटके विमुक्तांचा स्वातंत्र्यदिन पाळला जातो. तेंव्हा १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट हा पंधरवडा भटके विमुक्त पंधरवडा पाळण्यात यावा व या काळात विविध संवाद व त्यांच्या प्रश्नांवर ठोसपणे कृती योजना होण्याची आवश्यकता असल्याचे परिषदेने निवेदनात व प्रत्यक्ष चर्चेत सांगितले. 
 
 
यासंदर्भात भटके विमुक्त कल्याण विभागाची जबाबदारी असलेले मंत्री राम शिंदे यांनी या विषयी सकारात्मक आश्वासन दिले असल्याचे समजते. यावेळी परिषदेचे कार्यवाह-नरसिंग झरे, उपाध्यक्ष-चंद्रकांत गडेकर, डॉ.संजय पुरी, उद्धवराव काळे, विजयकुमार वाघमारे, महादेवराव गायकवाड, रावसाहेब ढवळे हे पदाधिकारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@