आता काय पतंजली आणि रिलायन्स डेअरीची वाट पाहताय का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

धनजंय मुंडे यांची सरकारवर खोचक टीका





नागपूर : राज्यामध्ये समाधानकारक पाऊस पडता असताना शेतकऱ्याला शेतात काम करण्यासऐवजी रस्त्यावर आंदोलन करावे लागत आहे. सगळी परिस्थिती व्यवस्थित असताना देखील सरकार शेतकऱ्यांना दरवाढ देत नाही. त्यामुळे सरकार दरवाढीसाठी आता काय पतंजली आणि रिलायन्स दूध डेअरी येण्याची वाट पाहतेय का ? असा खोचक सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला विचारला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आज सत्रात ते आज बोलत होते.

राज्यामध्ये सध्या अत्यंत समाधानकारक असा पाऊस पडत आहे. त्यामुळे खरे तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामांकडे अधिक लक्ष दिला पाहिजे होते. परंतु सरकारच्या धोरणांमुळे मात्र शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या वेळेला देखील शेतकऱ्यांना आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले होते. परंतु सरकारने त्यांना आश्वासन देण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे' अशी टीका त्यांनी यावेळी केली.





सरकारने २६ जून २०१७ ला गाईच्या दुधाला २७ रूपये आणि म्हशीच्या दुधाला ३६ रूपये भाव देण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना केवळ प्रतिलिटर १७ रूपये भाव मिळत आहे. सरकार केवळ मलमपट्टी करण्याचे धोरण अवलंबित असून केवळ घोषणांमुळे दुध उत्पादकांचे पोट भरणार नाही. त्यामुळे दूधाला प्रतिलिटर ५ रूपये थेट अनुदान आणि दुध भुकटी निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात यावी, तसेच हे अनुदान दोन महिन्यांसाठी नव्हे तर सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.




@@AUTHORINFO_V1@@