पंतप्रधानांची सभा चालू असताना मंडप कोसळला; २० जण जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |



कोलकाता - पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा चालू असताना अचानक सभेसाठी देण्यात आलेला मांडव कोसळला. मांडव कोसळून झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असल्याने मिदनापूर येथे त्यांच्या सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पंतप्रधानांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. याच दरम्यान मांडवातील एका भागावर ताण आला आणि त्याचा काही भाग सभेसाठी उपस्थित असलेल्यांवर कोसळला. या अपघातात सुमारे २० जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.

 

प्राथमिक माहितीनुसार, या भागात सतत पाऊस पडत होता. यामुळे या मैदानातील माती ओली झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी भाषणादरम्यान मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर कडाडून हल्लाबोल केला.

@@AUTHORINFO_V1@@