दूध उत्पादकांबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |
 
 
नागपूर : सभागृहात शिवसेना शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी करत आहे, मात्र सरकारमध्येही सामील होत आहे. शिवसेनेची भूमिका शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आहे की नाही हेच स्पष्ट होत नाही. त्यामुळे 
इथेही शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. दुधाच्या विषयावर सभात्याग करुन विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
 
 
दूध उत्पादक संघ चुकीचे वागत आहे असा अपप्रचार भाजपचे सदस्य करत आहेत. काही झाले की सहकार क्षेत्रावर खापर फोडायचे काम हे सरकार करत आहे. विधानसभेचे अध्यक्ष खुद्द एका संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांना या क्षेत्रातील अडचणी माहित आहेत. मात्र दूध उत्पादकांचे दुःख भाजपचे लोक समजू शकत नाहीत असे पवार यावेळी म्हणाले. सरकार दूध संघावर दमदाटी करत आहेत. अनुदान जाहीर केले नाही तर दुधाच्या पावडरला मिळणारे अनुदान बंद करू अशी धमकी दिली जात आहे असे पवार यांनी यावेळी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@