खड्ड्यांवरून मनसेचं 'खळ्ळखट्याक' आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |


 


नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांमुळे मनसेने 'खळ्ळखट्याक' आंदोलन सुरू केले आहे. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती झाली नाही, तर पुढील लक्ष्य मंत्रालय असेल, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

 

मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामध्ये दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलांचादेखील समावेश असून यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून गेल्या ८ दिवसात दोन जणांना खाड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मनसेने प्रशासनाकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. मात्र मागणी करुन देखील प्रशासन दखल घेत नसल्याकारणाने 'खळ्ळखट्याक' आंदोलन करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी स्वीकारली.

 
 
 

पोलिसांनी या प्रकरणात मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 'कार्यकर्त्यांचे आंदोलन योग्यच आहे. सरकारला खड्डे दिसत नसतील तर आंदोलन दिसेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@