फ्रांसचं कौतुक करणाऱ्या किरण बेदी सोशल मिडियावर झाल्या ट्रोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कालच्या फिफा विश्वचषक २०१८ चा अंतिम सामना फ्रांसने आपल्या खिश्यात घालून घेत असतांना त्यांचे कौतुक करण्यासाठी भारताची माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी पेचात पाडणारे ट्वीट केले आहे. त्यामुळे सध्या त्या सोशल मिडियावर जोरदार ट्रोल होतांना दिसत आहे. 
 
 
 
 
 
पुदुच्चेरीमध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी फ्रेंच वसाहत राहत होती त्यामुळे फ्रांसचा संघ मिश्र स्वरूपाचा संघ असून यामुळे पुदुच्चेरीचा देखील विजय झाला आहे. खेळ हा सगळ्यांना जोडतो. पुदुच्चेरीवासियांना देखील माझ्याकडून शुभेच्छा अशा अर्थाचे ट्वीट करत किरण बेदी यांनी राष्ट्रवाद निर्माण करणारे ट्वीट केले आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे म्हणून सध्या त्या सोशल मिडियावर ट्रोल होतांना दिसत आहे. 
 
 
 
 
आपण सगळे भारतीय आहोत बेदी मॅडम, तुमचा पब्लिसिटी स्टंट थांबवा... अशा शब्दांमध्ये नेटकरी त्यांना ट्रोल करीत आहेत. काँग्रेसचे नेते देखील त्यांच्या या ट्वीटमुळे संतापले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेदी यांना राजीनामा मागावा असा सल्ला काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. भारत आता स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे फ्रांसच्या जिंकण्याने भारताला कसला फायदा. भारत फिफा विश्वचषक जिंकला असता तर आम्ही उत्सव केला असता असे देखील काही नेत्यांनी म्हटले आहे. 
 
 
  
 
@@AUTHORINFO_V1@@