खडकवासला धरणात ९९ टक्के पाणीसाठा जमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

धरणातून २ हजार क्युसेक पाण्याचा करण्यात आला विसर्ग




पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये आज सकाळी सहा वाजता ९९ टक्के पाणी साठा जमा झाला असून यामुळे पुणे पाटबंधारे विभागाने धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुण्यातील मुठानदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहर परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरु आहे. पुण्याजवळील मावळ खोऱ्यात आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे काल संध्याकाळपर्यंत धरणामध्ये ९१ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. यामुळे पाटबंधारे विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच यासंबंधीची सूचना देखील पुणे महानगरपालिकेला देण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने तत्काळ कारवाई करत, नागरिकांना सतर्क राहण्याच्या इशारा दिला.

तसेच नदीपात्रामध्ये सुरु असलेल्या पुणे मेट्रोच्या कामाला देखील तात्पुरत्यास्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. मेट्रोच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री देखील नदीपत्रातून हलवण्यात आली आहे. यानंतर सकाळी ८ वाजता धरणातून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@