चैतन्यशक्‍ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |


 

‘चैतन्यशक्‍ती’ सर्वप्रथम खालावते व त्यामुळे आजार होतात व आजार झाल्यावर शरीरातील पेशींमध्ये बदल होऊ लागतो. नुसता पेशींमधला बदल हा रोग नव्हे, तर पेंशीमधला बदल हा शेवटी होतो म्हणजेच पेशीबदल हा रोगाचा निकाल आहे.
 

मागील भागात आपण पाहिले की, माणूस हा नुसता हाडे पेशी यांचा समूह नाही. त्याच्याही पलीकडे आहे ते माणसाचे मन; जे या शरीरात कुठेही दिसत नाही, परंतु ते असते. ते सर्व शरीराला ताब्यात ठेवते. जर माणूस आहे, त्याचे शरीर आहे त्याचे मनही आहे, पण त्या शरीरात मनात जरचैतन्यनसेल, तर आपण त्या माणसाला काय म्हणतो? तर आपण त्यालामृतम्हणतो. म्हणजे काय तर, शरीर मन यांच्याही आधी एक ऊर्जा किंवा शक्ती कार्यरत असते ती शरीर मनाला ताब्यात ठेवते. याच शक्तीलाचैतन्यशक्तीकिंवा vital force असे म्हणतात. शरीर मनाची सुरळीत अवस्था ही याचचैतन्यशक्तीमुळे असते. हीचैतन्यशक्तीजोपर्यंत निरोगी असते, तोपर्यंत शरीर मन हे निरोगी असते. ज्यावेळी या चैतन्यशक्तीमध्ये कमकुवतपणा येतो, तेव्हाच बाहेरील दुसरी वाईट ऊर्जा शरीर मनाला काबूत आणू पाहते त्यालाच आपणरोगझाला, असे म्हणतो.

 

कारण नव्हे. रोगाचे कारण हे पेशी बदलाच्या आधी असते. म्हणूनचहोमियोपॅथीही रोगाचे कारण मूळ शोधण्यावर जास्त भर देते. माणूस हा शरीर मन यांनी बनलेला असतो चैतन्यशक्ती त्यांना नियंत्रित करते म्हणजेच ताब्यात ठेवते. माणसाचे मन हे मुख्यत्वे इच्छाशक्ती (will) आणि परिस्थितीला समजून घेण्याची कला (understanding) याने बनते. निरोगी माणसात शरीर मन यांचा व्यवस्थित सुसंवाद होत असतो ताळमेळही असतो. त्या सुसंवादाला करीपू असे म्हणतात आणि माणसाची चैतन्यशक्ती हा सुसंवाद ठेवत असते.

 

आता, आपण ही चैतन्यशक्ती नेमकी कशी कार्य करते? तिचे गुणधर्म काय आहेत? हे पाहूया.

1. भौतिक अस्तित्व नसलेली (harmony spirit like)- चैतन्यशक्ती ही कुठल्याही भौतिक परिमाणांमध्ये मोजता येऊ शकत नाही. आपण ज्यालाशरीराचा आत्माम्हणतो; ही चैतन्यशक्ती आणि ती भौतिकदृष्ट्या दिसत नसल्यामुळे तिचा भौतिक अनुभव आपल्या ज्ञानेंद्रियांना घेता येत नाही. परंतु, ही शक्ती असतेच तिच्याशिवाय माणसाच्या शरीराला मनाला जिवंतपणा नाही हे आपण पाहिलेच आहे. ही ऊर्जा जी आहे ती दिसत नाही. परंतु, त्या ऊर्जेचे अस्तित्व मात्र आपण बघू शकतो. ते म्हणजे माणसाचा जिवंतपणा. उदाहरणार्थ- आपण विजेला पाहू शकत नाही. पण आपण इलेक्ट्रीसिटीचे अस्तित्व जाणतो. त्याचप्रमाणे, आपण लोहचुंबकाची चुंबकीयशक्ती पाहू शकत नाही. परंतु जेव्हा लोहचुंबक लोखंडाला आकर्षित करते तेव्हा त्यातील चुंबकीय शक्तीचा अनुभव आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण चैतन्यशक्तीला पाहू शकत नाही, परंतु तिचे अस्तित्व मात्र शरीरावर मनाच्या विविध प्रकटीकरणावरून दिसून येते.

 

चैतन्यशक्तीबद्दल सर्वप्रथम डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांनी विस्ताराने लिहिले सर्व आजाराचे मूळ या चैतन्यशक्तीच्या मध्ये असते हे सांगितले. चैतन्यशक्ती दिसत नसल्याने त्यावेळच्या लोकांनी त्यांच्या या सिद्धांतावर आक्षेप घेतला. परंतु, हळूहळू सर्व लोकांना समजून चुकले की, डॉ. हॅलेमान सत्य सांगत आहेत. शरीर मनाच्या मागेसुध्दा एक अदृश्य शक्ती ज्याला आपण आत्मा असे म्हणतो ती आहे त्याच्याशिवाय जीवंतपणा नाही. नुसते शरीर हे पेशी मन या चैतन्य ऊर्जेशिवाय जीवंत राहू शकत नाहीत.

-डॉ. मंदार नि. पारकर

@@AUTHORINFO_V1@@