पाच किलोने घटवले युरियाच्या गोणीचे वजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

कृषी अधिकार्‍यांची माहिती

जळगाव :
युरियाच्या ५० किलोच्या गोणीमध्ये शासनाने पाच किलोची घट केल्याने सध्या शेतकर्‍याला ४५ किलो युरिया देण्यात येत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर टाळण्यासाठी हे वजन घटवण्यात आले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
 
 
खरीप हंगाम सुरू असून शेतकरी कृषी केंद्रांवर खते, बियाणे खरेदी करण्यासाठी जात आहेत. त्यांना युरियाची गोणी ५० किलो एवजी ४५ किलोची मिळत आहे. गोणीमध्ये पाच किलो युरिया कमी येत आहे.
 
 
कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी म्हणाले की, शासनातर्फे अनुदानावर शेतकर्‍यांना रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात येतो. पूर्वी युरियाची ५० किलो वजनाची गोणी उपलब्ध करून दिली जात होती.
 
 
यंदापासून युरियाची गोणी ५० किलोवरून घटवून ४५ किलोची करण्यात आली आहे. बाजारात आता या निमकोटेड युरियाच्या गोण्या उपलब्ध आहेत. शेतीमध्ये बेसुमार खतांचा वापर टाळण्यासाठी सरकारतर्फे हा उपाय करण्यात येत आहे. युरियामुळे जमिनीच्या सुपिकतेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे शासनाने बेसुमार रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी गोणीमध्ये युरियाची पाच किलोची घट करण्यात आली आहे.
 
 
वजनाची खात्री करून घ्या
काही कृषी सेवा केंद्र चालकांकडे ५० किलोच्या गोण्या उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी युरिया विकत घेताना गोणीमध्ये किती किलो युरिया आहे? याबाबत खात्री करून घ्यावी. अन्यथा ४५ किलोच्या गोणीला ५० किलोप्रमाणे दर आकारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४५ किलोची युरियाच्या गोणीची किंमत २६५ रुपये आहे. जुन्या ५० किलो वजनाच्या गोणीची किंमत २९५ रुपये आहे. क्षेत्रानुसार करावयाचा खतांचा वापर, किंमत व शासनाकडून त्यावर मिळणारे अनुदान याबाबत गोणीवर उल्लेख करण्यात आलेला असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. 
@@AUTHORINFO_V1@@