खडकवासला धरणाचे दोन दरवाजे उघडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
 
पुणे :  पुणे येथील खडकवासला धरणाचे आज दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे आसपासच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने धरण पूर्णपणे भरले असून त्यामुळे आता आज खडकवासला धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 
 
 
दुपारनंतर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तिसरा दरवाचा देखील उघडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुळा आणि मुठा नदीत आता पाणी येणार असून यामुळे पुणे शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. खडकवासला धरणात ९९ टक्के पाणी साठा झाला असून आता पाण्याचा विसर्ग करणे गरजेचे असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. 
 
 
 
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून देखील ४७१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणा धरणातून ६६०२ क्युसेक तर नांदूर मधमेश्वर धरणातून ७२१० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@