शहरातील खड्डेप्रश्‍न चिघळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |



 
 
ठाणे: ठाणे शहरातील खड्ड्यांचे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. या संबंधित महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काल तातडीने सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित केली. या बैठकीत शहरातील खड्ड्यांची वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून आज आयुक्त रस्त्यावर उतरणार आहेत.
 

गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असून त्यामुळे शहरातील खड्ड्यांचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला. या बैठकीत त्यांनी सिमेंट किंवा डांबराचा वापर करून खड्डा भरता येणे शक्य नसेल तर पर्याय म्हणून पेव्हरब्लॉकने खड्डे भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

 

दरम्यान खड्डे भरताना रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत, एमएमआरडीएचे आहेत की, रस्ते विकास महामंडळाचे आहेत हे न तपासता ते रस्ते तत्काळ भरण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश सर्व अभियंत्यांना देण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@