जळगाव महापालिकेत भाजपाला मिळतील ५२ पेक्षा जास्त जागा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

गुप्तचरांचा अंदाज, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

 
 
जळगाव :
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाला ५० ते ५२ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा गुप्तचर संस्थांचा मतदानपूर्व अंदाज आहे. जनतेलाही भाजपाच्या रुपाने चांगला पर्याय मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
 
 
भाजपा-रिपाइं युतीचे उमेदवार आणि पक्ष पदाधिकार्‍यांचा ‘विजय संकल्प’ मेळावा रविवारी ब्राह्मण सभेत झाला. मंचावर जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे (महानगर), उदय वाघ (ग्रामीण), आ. स्मिताताई वाघ, आ. चंदुलाल पटेल, विभागीय संघटनमंत्री ऍड. किशोर काळकर, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, श्रीराम खटोड, महेश जोशी उपस्थित होते.
 
 
चंद्रकांतदादा म्हणाले की, महापालिका निवडणूक भाजपाकडून लढविता यावी म्हणून जळगावमधील अनेकजण इच्छुक होते. त्यांच्यातून संधी मिळालेल्या ७५ जणांनी स्वतःला भाग्यवान समजायला हवे. निवडणूकपूर्व सर्वेक्षण करून ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी खूप चांगला लढलो, खूप चांगला खेळलो पण थोडक्यात हरलो, असे सांगू नये. यापेक्षा लोकशाहीत विजय महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने नियोजन करावे.
 
 
अलीकडे राजकारणात लोकप्रतिनिधी होणे म्हणजे लोकांच्या विकासाचे माध्यम समजले जाते. सरकारी योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपापल्या संपर्काचा वापर करून जनतेची कामे करण्याला प्राधान्य द्यायला हवे. जनतेच्या उपयोगी (विशेषतः आरोग्यविषयक सेवा-सुविधा) पडाल तर ते भाजपाचे चिन्ह - ‘कमळ’चे भरभरून कौतुक करतील. सांगोला मतदारसंघाचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने विधानसभेत निवडून येत आहेत. ते पैसा खूप काही खर्च करीत नाहीत मात्र, लोकांची कामे करण्याला त्यांचे प्राधान्य असते. जळगाव महापालिका निवडणुकीतील उमेदवारांनीही त्यांचा आदर्श जरूर घ्यावा, असा कानमंत्रही चंद्रकांतदादांनी दिला.
 
 
कोणता उमेदवार किती पुढे? पक्षाकडून देणार दररोज माहिती
उमेदवार निवडणूक प्रचारात किती पुढे आहे याची दैनंदिन माहिती त्याला पुरवली जाणार आहे. त्याची व्यवस्था लागतेय. उमदेवारांनी उत्तम शहर उभे करण्याचा संकल्प करावा. येत्या २६ व २७ रोजी आपण स्वतः जळगावमध्ये येणार आहे. सभेत बोलण्यापेक्षा मतदारांच्या वैयक्तिक भेटींवर भर असल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@