रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मनसेची पीडब्ल्यूडीच्या कार्यलयात तोडफोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |



नवी मुंबई : वारंवारपणे प्रशासनाकडे तक्रार करून देखील रस्त्यावरील खड्डे बुजत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज नवी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपल्या भाषेत समज दिली आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली असून रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्यासाठी सांगितले आहे. अन्यथा कार्यालयाप्रमाणेच यापुढे थेट मंत्रालयाचीच तोडफोड करू इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.


मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच यामुळे या मार्गावर वारंवार अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे तुर्भेतील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची तक्रार देखील करण्यात आली होती. परंतु कार्यालयातील अधिकार याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज थेट या कार्यालायावरच धाव घेत, तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच लोकांचे बळी घ्याल तरच या भाषेत उत्तर देऊ, अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे.



दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मात्र मोठा त्रास होत आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात कल्याणमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे एकूण पाच जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे खड्यांचा प्रश्न हा अत्यंत बिकट झाल्याचे समोर आले आहे. परंतु वारंवारपणे प्रशासनाकडे याची तक्रार करून देखील त्यावर कारवाई मात्र केली जात नाही.
@@AUTHORINFO_V1@@