भाजपाच्या प्रचार मोहिमेचा दणक्यात शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

विजयासाठी ग्रामदैवत श्रीरामाला साकडे, कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती

जळगाव, १५ जुलै :
 
जळगाव महापालिका निवडणुकीतील भाजपा आणि आरपीआय आठवले गटाच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी, ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रामदैवत श्रीरामाला नारळ वाढवून करण्यात आला.
 
 
याप्रसंगी जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष आ. सुरेश भोळे, आ. चंदूभाई पटेल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते वामनदादा खडके, बंडूदादा काळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे, भाजपा गटनेते सुनील माळी, किशोर चौधरी तसेच निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार मीना धुडकू सपकाळे, दत्तात्रय देवराम कोळी, रंजना भरत सपकाळे, प्रवीण रामदास कोल्हे, चेतन गणेश सनकत, भारती कैलास सोनवणे, चेतना किशोर चौधरी, मुकुंदा भागवत सोनवणे, मीनाक्षी गोकुळ पाटील, रंजना वानखेडे (सोनार), सुनील वामनराव खडके, डॉ. विश्‍वनाथ सुरेश खडके आदी उपस्थित होते.
 
 
ना. गिरीश महाजन यांनी सिंधी कॉलनीतील सेवा मंडळात जाऊन दर्शन घेतले. भाजपाच्या विजयासाठी प्रार्थना केली. या वेळी विभागीय संघटनमंत्री ऍड. किशोर काळकर उपस्थित होते. पत्र्या हनुमान मंदिर ः जिल्हा परिषद चौक, हनुमान मंदिर ः जिल्हा बँकेशेजारी, ओंकारेश्‍वर मंदिर, झुलेलाल मंदिर, साई बाबा मंदिर व संतोषी माता मंदिर (मेहरूण), भवानी मंदिर ः पिंप्राळा, हनुमान मंदिर ः पिंप्राळा, गणपती मंदिर ः खोटेनगर येथेही प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला.
 
 
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) उदय वाघ, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, मंडळ अध्यक्ष राहुल वाघ, अतुल हाडा, पिंटू काळे, कपिल पाटील, राजू मराठे, नितीन इंगळे, हेमंत शर्मा, आशिष वाणी, संजय शिंदे, तसेच उमेदवार ः प्रिया मुधकर जोहरे, सरिता अनंत नेरकर, दिलीप बबनराव पोकळे, खान रुखसानाबी गबलू खान, कांचन विकास सोनवणे, नवनाथ विश्वनाथ दारकुंडे, गायत्री उत्तम शिंदे, किशोर रमेश बाविस्कर, जहाआरबी बशीर खान पठाण, आकांक्षा देवेश शर्मा, अनिल चंद्रकांत पगारिया, अमित पांडुरंग काळे, मंगला संजय चौधरी, ऍड. सुचिता अतुलसिंह हाडा, धीरज मुरलीधर सोनवणे, सीमा सुरेश भोळे, दीपमाला मनोज काळे, अश्विन शांताराम सोनवणे, सचिन भीमराव पाटील, राकेश जिजाबराव पाटील, लताबाई रणजित भोईटे, प्रतिभा सुधीर पाटील, चंद्रशेखर शिवाजी पाटील, मयूर चंद्रकांत कापसे, प्रतिभा चंद्रकांत कापसे, प्रतिभा गजानन देशमुख, विजय पुंडलिक पाटील, सुरेश माणिक सोनवणे, शोभा दिनकर बारी, हसीना बी शरीफ शेख, कुलभूषण वीरभान पाटील, पार्वताबाई दामू भील, उषा संतोष पाटील, सिंधूताई विजय कोल्हे, रवींद्र चंद्रकांत पाटील, उज्ज्वला मोहन बेंडाळे, गायत्री इंद्रजित राणे, जीवन अत्तरदे, सुरेखा नितीन तायडे, ज्योती बाळासाहेब चव्हाण, जितेंद्र भगवान मराठे, अंजनाबाई प्रभाकर सोनवणे, रेखा चुडामण पाटील, सुरेखा सुदाम सोनवणे, सदाशिवराव गणपतराव ढेकळे, राजेंद्र झिपरू पाटील, मेहमूद मोहंमद बागवान, रिजवाना वसीम खान, अनुसया नामदेव ढेकळे, अशोक सीताराम लाडवंजारी, भगतराम रावलमल बालाणी, रजनी प्रकाश अत्तरदे, रेश्मा कुंदन काळे, मनोज नारायणदास आहुजा, अनिल पंडित देशमुख, शबानाबी सलीम पटेल, शकीलाबी मोहंमद पटेल, जितेंद्र शिवाजी चौथे, शरीफा रहेमान तडवी, ललित कोळी, ज्योती विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
 
 
फटाके फोडून स्वागत
ना. गिरीश महाजन यांचे आगमन होताच फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, ‘गिरीशभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राजूमामा आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘चंदूभाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ या घोषणांचा पाऊस कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढवत होता. ‘बोला सियावर रामचंद्र की, जय’ ‘पवनपुत्र हनुमान की, जय’ अशा घोषणा देत संकटमोचक हनुमानाच्या मूर्तीसमोर प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@