मनुष्यहानीसोबतच वन्यप्राण्यांच्या सर्ंवधनाचाही विचार व्हावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

वन्यजीव समिती, पक्षीमित्र, सर्पमित्र यांचे आवाहन
वन्यजीव सर्ंवधन करणे काळाची गरज

 
जळगाव : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी, पशुधन मृत, अपंग झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यात शासनाने वाढ केली आहे. वाघ, लांडगा, बिबट्या, तरस अस्वल, हत्ती, रानकुत्रे यांच्या हल्लयात मनुष्यहानी झाल्यास आता १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य वारसांना मिळणार आहे. हा निर्णय मनुष्यासाठी चांगला असला तरी शासनाने वन्यप्राण्यांच्या संवर्धनाहीचाही विचार करावा असा सूर वन्यजीव समिती, पक्षीमित्र, सर्पमित्र यांनी तरुण भारतशी बोलतांना व्यक्त केला.
 
 
वन्यप्राणी सर्ंवधनासाठी ठोस पावली उचलावीत
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानापोटी शासनाकडून १० लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे. हा निर्णय चांगला आहे. मात्र दिवंसेदिवस जंगलांचे प्रमाण कमी होत असल्याने याचा सर्वाधिक परिणाम वन्यप्राण्यांच्या जीवनावर होत आहे. त्यांना जगण्यासाठी योग्य अधिवास नसल्याने ते अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आकर्षीत होतात. यामुळे हल्ल्यात होण्याच्या घटनांमध्ये निश्‍चितच वाढ होते आहे. शासनाने त्यांच्या सर्वधनासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.
- बाळकृष्ण देवरे, पक्षीमित्र, जळगाव.
 
 
मानव आणि वन्यप्राणी हल्ले यांच्यात समन्वय राखावा
प्रशासनाने पशुधन तसेच मानवी हल्लयासाठी शासनाने मंजूर केलेली १० लाख रुपये नुकसान भरपाई या निर्णय चांगला आहे. यामुळे नागरिकांचा शासनावरील विश्‍वास वाढीस लागेल. तर दुसरीकडे वनक्षेत्र आणि वन्यप्राण्यांसाठी योग्य कायदा करणेही तितकेच महत्त्वाचे असून वन्यजीवांसाठी तरतूद, जंगलाच्या बाहेर पाणवठ्यांची व्यवस्था, जंगलात गवताळ पट्टे यांची वाढ कशी होईल यासाठी योग्य ती मोहिम शासनाने राबविली पाहिजे.
- वासुदेव वाढे, वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष, जळगाव.
@@AUTHORINFO_V1@@