बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |
जळगाव, २७ जुलै :
जळगाव ते धाडशिरी या बसवर असलेल्या ऑनड्यूटी बसचालकाचे पहाटे ५ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली. अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .
 प्रेमराज भागवत सपकाळे (वय-४१) रा. बांभोरी ता. धरणगाव हे गेल्या १२ वर्षांपासून राज्य परिवहन मंडळात बसचालक म्हणून काम करत आहे. जळगाव आगारातील जळगाव-धाडशिरी या बसवर ऑनड्यूटी असताना रात्री मुक्कामाला थांबलेल्या बसमध्ये सकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांची तब्बेत बिघडली. मात्र, गावात डॉक्टर नसल्याने बाजूच्या गावातील डॉक्टरला बसचे वाहक हे घेण्यासाठी गेले होते. मात्र, पहाटे ५ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने बसचालक सपकाळे यांचे निधन झाले. गेल्या ९ महिन्यांपूर्वीच त्यांची जळगाव बस आगाराला बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील जाफराबाद येथे १० वर्षे बसचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे.
@@AUTHORINFO_V1@@