अभ्यंगं आचरेत् नित्यम् भाग ६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |



 

 

अभ्यंगाचे विविध पैलू या लेखमालेतून वाचकांसमोर सादर केले आहेत. अभ्यंग कोणी करावा, कधी व कसा करावा, कुठले तेल वापरावे इ. सर्व मुद्द्यांवर विवेचन केले आहे. याच बरोबर अजून एक मुद्दा म्हणजे Touch therapy च्या बद्दल थोडे आज जाणून घेऊ.


अभ्यंगामध्ये शरीराला जे तेल लावले जाते, ते स्वत:च्या हाताने, स्वत:च्या संपूर्ण शरीराला, प्रत्येक अंगाच्या अवयवाला चोळले जाते, लावले जाते. स्वत:चाच स्पर्श स्वत:च्या शरीराला एरवी कधी होतो का? तर नाही होत. त्वचेला लागले किंवा खरचटले तरच आपले त्वचेकडे लक्ष जाते. थंडीत त्वचा फुटली की त्यावर क्रीम, लोशन लावले जाते. पण, रोज अभ्यंग करताना जो हाताचा सुखद स्पर्श होतो, तो आरामदायी असतो. आजी- आजोबांचे पाय चेपून दिल्यावर त्यांना कसे बरे वाटते? जरी नातवाच्या हाताला जोर नसला, तरी त्या स्नेहपूर्वक स्पर्शानेच अर्धे दुखणे पळून जाते. आईने झोपवताना थोपटणे, बरं वाटत नसताना आईने जवळ घेणे, भीती वाटली असताना कुशीत घेणे, रडणे थांबण्यासाठी डोक्यावर पाठीवरुन हात फिरविणे, शाबासकीची थाप देणे, मैत्रीमध्ये आलिंगन देणे, हे सर्व स्पर्श चिकित्सेच्या अंतर्गत येते. आपल्या स्पर्शाने आपले विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येतात. रागाने मार पडलेला कळतो आणि मस्करीत मारलेली पाठीवरची थाप यातील फरक न बोलताच कळतो. काही वेळेस एकाकी वाटत असताना, मन भरुन आलं असताना चिडचिड, उद्वेग, घालमेल होत असताना अभ्यंग केल्याने एक प्रकारची शांती लाभते. शरीरातील मांसपेशी रिलॅक्स होतात. चिंता, ताणतणाव असताना मानेचे-खांद्याचे स्नायू कडक होतात, दुखू लागतात. मालिशने, अभ्यंगाने हे कडक स्नायू शिथील होण्यास मदत होते आणि ताणतणाव, चिंता निघून गेल्यासारखा वाटतात.

 

शिरोभ्यंगाने ही प्रचिती येते. डोक्याला तेल लावून मालिश केल्याने आधी सांगितलेले सगळे फायदे तर मिळतातच, पण त्याचबरोबर मन:शांतीसुद्धा लाभते. ज्यांना रात्री लवकर झोप लागत नाही किंवा तुटक लागते, त्यासाठी संध्याकाळी शिरोऽभ्यंग उपयोगी आहे. ताण कमी करण्यासाठी पादाभ्यंग करुन शिरोभ्यंग करावे. असे केल्याने उत्तम वाटते. झोपेची तक्रार ज्यांची आहे, त्यांनी संध्याकाळी अभ्यंग करुन नंतर गरम पाण्याने अंघोळ करावी; मग कोमट दूध आणि तूप प्यावे. निश्‍चितपणे लहान मुलांसारखी शांत झोप लागते. पण, यासाठी टीव्ही, मोबाईल, संगणक इ. साधने रात्री आठ नंतर वापरु नये. खूप प्रकाशमय वातावरणात बसू नये. मन शांत होण्यासाठी या काही सोप्या युक्त्या आहेत.

 

टच थेरपी ही फार महत्त्वाची चिकित्सा आहे. बोलता न येणार्‍या तान्हुल्यांनाही आईचा स्पर्श ओळखता येतो. अंधव्यक्तीही स्पर्शाने समोरची व्यक्ती कशी आहे हे ओळखतात. स्पर्शातून माया, ममता, आपलेपणा जाणवतो. तसेच उद्वेग, राग, त्रागाही कळतो. म्हणून स्नेटन (तेल लावणे) मालिश करुन घेणे, हे त्यांच्याकडूनच करुन घ्यावे, ज्यांना आपल्या विषयी राग-द्वेष-मस्तर नाही. स्वत:चे हित सर्वांनाच हवे असते आणि म्हणूनच अभ्यंगासाठी स्वत:च्याच हातांचा उपयोग करावा. प्रत्येक व्यक्तीची सोशिकता वेगवेगळी असते. काहींना गरम तेलाचा स्पर्श आवडतो, तर काहींना हा स्पर्श सहन होत नाही. काहींना मालिशच्या वेळेस थोडा दाब जास्त लागतो, तर इतरांना अगदी हलक्या हाताने केलेले मालिश आवडते आणि सहन होते. अशी भिन्नता असल्याने तसेच तेल लावायची विशिष्ट पद्धत असल्यामुळे आपणच रोज आपले अभ्यंग करणे हे नेहमी इष्ट.

 

अभ्यंग हा नित्य उपक्रमातील एक उपक्रम आहे. अभ्यंग, अवगाह व परिषेक या तीनही क्रियांमध्ये तेलाचा वापर होतो. पण, अन्य काही मसाजपद्धती देखील आहेत, ज्यामध्ये तेलाचा वापर होत नाही. तसेच हे विविध मसाज प्रकार रोजच्या दिनचर्येतील भाग नसावेत. आठवड्यातून एक-दोनवेळा (व्यक्तिसापेक्ष यात बद्दल होतो)अशा काही मसाज थेरेपी खालील प्रमाणे आहेत : Aroma therapy,deep tissue massage,Swedish massage,hot ston massage इ.

 

अरोमाथेरेपी

विशिष्ट तेलांचा वापर या प्रकारच्या मसाजमध्ये केला जातो. Essential Oils/Aroma Oils चे थेंब इतर तेलांमध्ये विशिष्ट प्रमाणात घालून हे मिश्रण वापरले जाते. हे तेल उकळविले जात नाही. Hot Bath (कोमटसर) किंवा साधे तेल वापरले जाते. या प्रकारच्या मसाजमध्ये आधी पायापासून सुरुवात केली जाते. पायाचे घोटे, गुडघे, मांड्या मग मणके-पाठ-हात-मनगट आणि मग मान-खांदे या पद्धतीने मालिश केले जाते. पहिल्या पद्धतीत तेल लांब Strokes शी मध्ये लावले जाते. नंतर थोडे जिरवले जाते. या प्रकारच्या मसाजमध्ये खूप जोर दिला जात नाही. थोडा दाब आणि घर्षण हलक्या हाताने केले जाते. यानंतर सहा-आठ तासाने अंघोळ करण्यास सांगितले जाते. आठवड्यातून एकदा अरोमा मसाज पुरेसा आहे. रोज करू नये.

 

स्विडीश मसाज

ही मसाज पद्धती पाश्‍चिमात्य तत्त्वावर आधारित आहे. यात मुख्य पाच प्रकारचे मसाज Strokes पद्धतशीररित्या केले जातात- Effleurage, Petrissage, Tapotement, Friction & Vibration.

 

Effleurage

यात हलक्या हाताने तेल शरीरावर पसरविले जाते. काही वेळेसच तेल लावले जाते. यात कधी हलक्या हाताने व थोड्या दाबाने मालिश केले जाते. तळव्याने किंवा बोटांच्या टोकाने ही डींशि केली जाते.

 

Petrissage

यात विशिष्ट दुखर्‍या भागावर मळल्यासारखे केले जाते. (कणिक मळताना जसे अंगठे व बोटांच्या सांध्याच्या हाडाचा वापर केला जातो, तसाच Kneading साठी या step मध्ये केला जातो.) कडक झालेले, जखडलेले स्नायू असल्यास या घपशरवळपस पद्धतीने त्यातील ताठरता कमी केली जाते. सांधा व स्नायू सुटतो. (आखडलेला मोकळा होतो.) त्या विशिष्ट अवयवाची लवचिकता वाढते, सुधारते आणि रक्तप्रवाह सुधारतो.

 

Tapotement

या step मध्ये हाताच्या तळव्यांचे खोलगट वाटीसारखे करून अंग-अवयवांवर थोपटले जाते किंवा हलके बुक्के मारले जातात. यानेही स्नायू, सांधा, अवयव सुटतो, हलका होतो आणि बरं वाटतं.

 

Friction

दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर घासून ऊर्जा उत्पन्न करून ती त्या अवयवांवर द्यावी. या उष्णतेमुळे रक्तप्रवाह सुधारतो. तसेच साचलेले अनावश्यक घटकही बाहेर टाकण्यास मदत होते.

 

Vibration

या step मध्ये हाताच्या बोटांनी किंवा तळहाताच्या मागील बाजूने, विशिष्ट स्नायू जागच्या जागी हलविला जातो आणि त्यातील ताण कमी केला जातो.

 

अशा पाच प्रकारच्या मसाजपद्धतीने स्विडीश मसाज केला जातो. Deep Tissue Massage (DTM) यातही स्विडीश मसाज पद्धतीनेच मसाज होतो. पण, सर्वांगावर न करता, दुखर्‍या भागावरच हा मसाज केला जातो. मुरगळलेला भाग, बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे दुखणारे स्नायू आणि आलेला बाक, ताठरलेले स्नायू इ. साठी ऊढच केले जाते. याने दुखणे कमी होते. तो भाग भरून येण्याची क्षमता सुधारते. स्नायूंमध्ये हलकेपणा जाणवतो. मुख्यत्वेकरून मान, कंबर तसेच विविध सांध्यांवर ऊढच केले जाते.

 
 हॉट स्टोन मालिश
 

यात विशिष्ट प्रकारचे काळे, गुळगुळीत दगड तापविले जातात आणि विशिष्ट अवयवांवर ठेवले जातात. या दगडांना Basalt Volcanic Rock म्हणतात आणि यात उष्णता अधिक काळ धरून ठेवण्याची, रोखून ठेवण्याची क्षमता असल्याने हे दगड वापरले जातात. या उष्णतेमुळे त्या अवयवांत उष्णता निर्माण होऊन हलकेपणा येतो. ताण कमी होतो. पण, वरील सर्व प्रकारचे मसाज प्रत्येकाने करू नयेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करावा.

(क्रमशः)

-वैद्य कीर्ती देव

@@AUTHORINFO_V1@@