मुक्ताईनगरला ६५ टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |

भाजपासह शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचाही विजयाचा दावा

 
मुक्ताईनगर, १५ जुलै :
 
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत १५ जुलै रविवार रोजी एकूण २१ हजार ३३० मतदारांपैकी १३ हजार ९६५ मतदारांनी (६५.४७) टक्के आपला हक्क बजावला.
चुरस असूनही अपेक्षित प्रमाणात मतदान झाले नाही. शेतीची कामे आणि लग्नसराईमुळे मतदानाचा टक्का कमी राहिला. यामुळे काही प्रभागात किरकोळ फरकामुळे जय-विजयाचे पारडे बदलू शकते, असा अंदाज आहे. दरम्यान भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने थेट नगराध्यक्षाचे पद आपलाच पक्ष काबीज करेल असा दावा केला आहे.
 
सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : बहुतांश वॉर्डात चुरशीच्या लढती
नगराध्यक्ष तसेच १७ वॉर्डांतील नगरसेवकांसाठी रविवारी मतदान झाले. भाजपच्या या बालेकिल्ल्यात बहुतांशी वॉर्डात चुरशीच्या लढती झाल्या. या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली होती. तर भाजपाने स्वबळावर लढत दिली. माजी मंत्री एकनाथराव खडसे स्वत: मुक्ताईनगरात तळ ठोकून होते. त्यांनी भाजपतर्फे तरुण आणि नवीन चेहर्‍यांना उमेदवारी दिल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नजमा तडवी, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माधुरी तायडे आणि कॉंग्रेसच्या ज्योत्स्ना तायडे यांच्यात तिरंगी झाली.
 
 
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या १४ जागा लढविल्या. तर कॉंग्रेसने नगराध्यक्षपदासह सात जागा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन जागांवर उमेदवार दिले होते. मतमोजणी २० जुलैला होणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येतील. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण ३५० पोलिस कर्मचारी तैनात होते. तर २९ बुथवर १८० कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्यात आली होती. सहा.निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ आढाव होते.
 
 
सर्व जागा जिंकणार
अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले असले तरी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार विजयी होतील, अशी अपेक्षा आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत घेतली. त्याचे नक्कीच फळ मिळेल.
एकनाथराव खडसे, माजी मंत्री, आमदार
शिवसेनेचा भगवा फडकेल
नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार विजयी होतील. नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकेल.
चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना
चांगली कामगिरी राहणार
यावेळी कॉंग्रेस पक्ष चांगली कामगिरी करणार आहे. जनतेचा सत्तापक्षाकडून भ्रमनिरास झालेला आहे.
डॉ.जगदीश पाटील, कॉंग्रेस
@@AUTHORINFO_V1@@