४८ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2018
Total Views |
जळगाव, २७ जुलै :
शहरातील कंजरवाडा आणि तांबापुरात येथे अवैधरीत्या दारू बनवून विक्री करणार्‍या चौघांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून कंजरवाडा आणि तांबापुरा येथे दारू पाडण्याचे काम सुरू असताना सामानासह सर्व कच्चे व पक्के रसायनांसह एकूण ४८ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली.
 
 
 पोलीस निरीक्षक आढाव, ईच्छादेवी पोलीस चौकीत गस्तीला असलेले पोलीस कर्मचारी हेमंत कळसकर, योगेश पाटील आणि संजय पाटील यांना कंजरवाडा आणि तांबापुरात अवैधरीत्या दारू बनवून विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक आढाव यांना तांबापुरा आणि कंजरवाडा भागात अवैधरीत्या गावठी दारू बनवणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर निरीक्षक आढाव व पोलीस कर्मचारी यांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तांबापुर्‍यात राहणारी वनाबाई देवसिंग बाटुंगे (वय-६०) रा. महादेव मंदिरामागे, तांबापुरा ही महिला गावठी हातभट्टीची दारू बनवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत जवळ असलेले दारू बनवण्याचे साहित्य  जप्त करून कच्चे रसायन नष्ट करून तब्बत १४ हजार २०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू नष्ट केली. दुसरीकडे कंजरवाड्यात राहणार्‍या निकिता गोविंदा बागडे, गीता राकेश बागडे, शोभा अनिल बागडे कंजरवाडा, हेदेखील गावठी हातभट्टीद्वारे अवैधरीत्या दारू बनवत असताना निदर्शनास आले. तिघांवरदेखील कारवाई करत जवळ असलेले सर्व साहित्य एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन कच्चे रसायन गटारीत फेकले. या कारवाईत तब्बल ३३ हजार ८०० रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली..
@@AUTHORINFO_V1@@