स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

सांगलीमध्ये दुधाचा टँकर अडवून दुध रस्तावर सोडले





सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी दुध दरावरून पुकारलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाले आहे. सांगली येथे मुंबईकडे जाणारा दुधाचा टँकर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर अडवून टँकरमधील दुध रस्तावर ओतून दिल्याची घटना घडली आहे. यावर दुग्ध मंत्री महादेव जानकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून दुध व्यावसायिकांना पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकार आणि स्वाभिमानी यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


सांगलीमधील वाळवा तालुक्यातील केदारवाडी फाट्याजवळ ही घटना घडली आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सांगलीमधून मुंबईकडे जात असलेला वारणा दुध संघाचा टँकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केदारवाडी फाट्याजवळ अडवला. तसेच टँकरचालकाला दमदाटी करत टँकरमध्ये सर्व दुध रस्त्यावर सोडून दिले. तसेच टँकरची देखील तोडफोड केली आहे.


दरम्यान स्वाभिमानी संघटनेच्या या कृत्यानंतर दुग्ध मंत्री महादेव जानकर यांनी दुधाच्या टँकरला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार याठिकाणी राज्य राखीव पोलीस दलांच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच महामार्गावर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे प्रकरण ?

शेतकऱ्यांना दुधासाठी राज्य सरकारने दर वाढवून द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. ही मागणी गाईच्या दुधासाठी म्हणून करण्यात आली असून यामध्ये प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी स्वभिमानीने केली आहे. तसेच मागणी मान्य न केल्यास मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा बंद करण्याचा इशारा स्वाभिमानीकडून देण्यात आला होता.

@@AUTHORINFO_V1@@