जनतेसाठी खोटे अश्रू ढळणाऱ्यांना आता जनतेनीच प्रश्न विचारण्याची गरज : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |





मिर्झापूर (उ.प्र.) : 'जनतेसमोर आज खोटे अश्रू ढाळून जनतेचे सांत्वन मिळवू पाहणाऱ्यांना आज जनतेनीच प्रश्न विचारण्याची गरज आहे' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर येथे 'बाणसागर कॅनॉल प्रकल्पा'च्या उद्घाटनप्रसंगी आज ते बोलत होते.


'कॉंग्रेस सरकारच्या गेल्या ६० वर्षांच्या काळामध्ये देशात अनेक योजनांची सुरुवात करण्यात आली, परंतु त्यातील एकही प्रकल्प आजतागायत पूर्ण झालेला नाही. सामान्य जनतेला वर्षानुवर्षे फसवत अनेक प्रकल्प गेल्या सरकारने अपूर्ण ठेवले आहेत. परंतु भाजप सरकारने सत्ते आल्यानंतर देशात अपूर्ण राहिलेल्या अनेक प्रकल्पांना मान्यता देत, या प्रकल्पांचे काम आज सुरु केले आहे. यातीलच एक प्रकल्प असलेल्या बाणसागर प्रकल्पाचे देखील आज लोकार्पण होत असून यामुळे मिर्झापूर ते अलाहाबादपर्यंतचा मोठा भूभाग सिंचन क्षेत्राखाली येणार आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांसाठी अश्रू ढळणाऱ्यांना शेतकऱ्यांनीच विकासावर प्रश्न विचारले पाहिजे, असे मोदींनी यावेळी म्हटले.






दोन दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मिर्झापूर येथे आले होते, याठिकाणी त्यांनी बाणसागर प्रकल्पासह अनेक नव्या योजनांचे उद्घाटन केले. तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या बाणसागर प्रकल्पामुळे मिर्झापूर ते अलाहाबाद दरम्यानची जवळजवळ १.५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे येतील सामान्य शेतकऱ्यांना याचा सर्वात अधिक फायदा होणार आहे. तसेच सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून '१०० जनऔषधी' केंद्राचे देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.




@@AUTHORINFO_V1@@