पंचगंगेनंतर आता गोदावरीच्या पाणी पातळीत ही वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

किनाऱ्यावरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा 





नाशिक : नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. नदीचे पाणी वेगाने वाढू लागल्यामुळे नदी किनारी असलेल्या सर्व गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्याभरापासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक हे नदीच्या कडेला फोटो काढण्यासाठी म्हणून गर्दी करत आहेत. तसेच लहान मुले देखील नदीच्या पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे नागरिकांना पात्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान मुंबई-पुणे आणि कोकण वगळता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईमध्ये गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. तसेच समुद्रामध्ये देखील मोठी प्रमाणात भरती आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@