जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

सात जणांचा जागीच मृत्यू



पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज झालेल्या दोन कार गाड्यांच्या भीषण अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ले येथे हा अपघात झाला असून यामध्ये कार गाड्यांच्या अक्षरशः चुराडा झाला आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहचले असून घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबईहून एक मारुती स्विफ्ट अत्यंत वेगाने पुण्याच्या दिशेने येत होती. यावेळी कार्ल्याजवळ वाहन चालकाचा अचानकपणे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही गाडी रस्ताविभाजक तोडून सरळ दुसऱ्या लेनमध्ये घुसली. याचवेळी पुण्याहून मुंबईकडे जाणऱ्या सँट्रो गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महामार्गाने होणारी वाहतूक काही काळासाठी रोखली आहे. भर रस्त्यामध्ये हा अपघात झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यात आज रविवार असलेल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@