नक्षलवादी हल्ल्यात २ जवान शहीद, ३ जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

 
 
कांकेर : छत्तीसगढ हे नक्षलवादासाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे. नुकत्याच छत्तीसगढच्या कांकेर येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे २ जवान शहीद झाले असून ३ जखमी झाले आहेत. बीएसएफचे जवान टेहळणी साठी निघाले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. सुरुक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात अद्याप चकमक सुरु आहे. मुख्तियार सिंह आणि लोकेंद्र असे शहीद झालेल्या जवानांचे नाव आहे. 
नक्षलवादी दबा धरून बसले होते, सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांच्यात अजूनही चकमक सुरू असल्याचे पंखाजपूरचे पोलीस अधिकारी राजेन्द्र जयस्वाल यांनी सांगितले. जखमी जवानांना रायपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चकमक सुरू असल्याने बीएसएफची आणखी एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.
या भागात नक्षलवादी मोठ्या संख्येने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शोधमोहिम राबवण्यात येत होती. टेहळणी करत असतानाच अचानक नक्षलवाद्यांनी जवानांच्यावर गोळीबार केला. गेल्या आठवड्यातच या भागातून ५ आईईडी बाँम्ब ताब्यात घेण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@