माउली आज फलटणमध्ये तर तुकोबांचा निमगाव केतकीमध्ये मुक्काम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |



पुणे : संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा मजलदरमजल करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आषाढी वारीच्या आजच्या १० व्या दिवशी संत ज्ञानेश्वर महराज यांचा पालखी सोहळा हा आजचा फलटण मुक्कामी दाखल झाला आहे. तर तुकोबांची दिंडी ही निमगाव केतकी येथे मुक्कामी पोहोचली आहे.



संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पहाटे तरडगाव येथून निघाली होती. वाटेमध्ये काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल आणि फलटण दुध डेअरी येथे विसावा घेत थोड्यावेळापूर्वी फलटणमध्ये दाखल झाली आहे. यावेळी फलटणमधील भाविकांनी देखील मोठ्या उत्साहाने माउलींच्या पालखी फलटणमध्ये स्वागत केले. पालखी दर्शनासाठी म्हणून आजूबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.



याचबरोबर संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आजच्या मुक्कामासाठी निमगाव केतकीमध्ये विसावला आहे. आज सकाळी बेलवंडी येथे तुकोबारायांच्या पालखीचे पहिले गोलरिंगण पार पडले. मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या साक्षीने हा रिंगण सोहळा पार पडला. यानंतर बेलवंडी येथे दुपारचा विसावा घेऊन शेळगावफाटामार्गे पालखी निमगाव केतकीमध्ये आली आहे.




 दरम्यान पालखी सोहळ्यामध्ये असलेल्या वारकऱ्यांची संख्या आता दुपट्टी वाढल्याचे दिसत आहेत. पुण्याहून निघाल्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक भाविक वारीमध्ये सहभागी झाल्यामुळे दोन्ही पालख्यांमधील वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भक्तांनी फुललेल्या या वारीचा उत्साह देखील द्विगुणित झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@