एक देश एक निवडणुकीला माझा पाठिंबा : रजनीकांत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

 
 
चेन्नई : 'एक देश एक निवडणूक' या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे. देशात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणूका होतात, यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ लागतो. मात्र एक देश एक निवणडूक संकल्पना राबविल्यास यामुळे पैसा आणि वेळेची बचत होईल असे प्रतिपादन दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते "रजनीकांत" यांनी केले आहे. चेन्नई येथे आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते.
 
 
रजनीकांत यांचे नुकतेच राजकारणात पदार्पण झाले असून लवकरच ते राजकारणात पूर्णपणे सक्रीय असणार आहेत. आता पर्यंत चित्रपट सृष्टीवर आपले अधिराज्य गाजवणारे 'थलायवा' म्हणजेच रजनीकांत यांच्या या वक्तव्यामुळे कदाचित या संकल्पनेबद्दल विचार करता येऊ शकतो. "यामुळे पैसा आणि वेळ वाचेल." असे रजनीकांत यांचे म्हणणे आहे.
 
 
रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून दबावही होता. याच दबावाचा भाग म्हणून २००८ मध्ये कोईंबतूर येथील रजनीकांत यांच्या चाहत्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती. पक्षाचे नाव आणि झेंडाही जाहीर केला होता. ही माहिती मिळताच रजनीकांत यांनी या घटनेशी आपला संबंध नसल्याचे तसेच अशा प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले होते. हा पक्ष गुंडाळला नाही तर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. राजकारणात आपल्याला रुची नाही, आपण फक्त चित्रपटातच काम करणार असल्याचे त्या वेळी जाहीर करणार्‍या राजनीकांत यांनी, तब्बल १० वर्षांनंतर राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. तसेच आता निवडणुकांच्या या वक्तव्यामुळे येथून पुढील काळात ते सक्रीय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@