भर कार्यक्रमात कुमारस्वामींना अश्रु अनावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

 
 
बंगळुरू : बंगळुरु येथे आयोजित एका कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना अश्रु अनावर झाले. युतीचा कारभार सांभाळणे किती वेदनादायक आहे, असे सांगत कुमारस्वामी भर कार्यक्रमात रडले. "महादेवाप्रमाणे मी वेदनेचे वीष पचवत आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 
 
 
 
 
"तुमच्यातील एक बंधू मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्ही आनंदी आहात आपला आनंद तुम्ही पुष्पगुच्छ आणि शुभेच्छांच्या रूपात माझ्यापर्यंत पाठवला मात्र मी आनंदी नाही. हे युतीचे सरकार आहे. यामुळे मला असंख्य वेदना होत आहेत आणि या वेदना मी महादेवांप्रमाणे पचवण्याचा प्रयत्न करतोय." अशा भावना व्यक्त करत त्यांना अश्रु अनावर झाले.
 
केवळ तीन महिन्याआधी कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली, मात्र तीन महिन्यातच हे पद त्यांच्याकडून सांभाळले जात नाहीये का? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. तसेच हा अभिनय होता कि खरे असा प्रश्न देखील अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 
@@AUTHORINFO_V1@@