मै सूरज ना सही..ज्योतही हूं..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018   
Total Views |




रा.स्व. संघ जनकल्याण समितीचा ’स्व. अप्पा सोहनी पुरस्कार’ चित्रा नलावडे यांना प्राप्‍त झाला, आपण घेतलेल्या सेवाव्रताचा कुठलाही बडेजाव न करता नव्या पिढीकडे अलगद सोपवण्याचे कौशल्य चित्रा नलावडेंकडे आहे.

१९९७ चे वर्ष असावे, नवागाव- दहिसरच्या जनकल्याण समितीच्या समाजकल्याण केंद्रासमोर -१० वर्षांच्या काही मुली खेळत होत्या. समाजकल्याण केंद्राचे केंद्रप्रमुख नाना दामलेंनी या छोट्या मुलींना सांगितले की,”बाहेर खेळण्यापेक्षा समाजमंदिरात येऊन खेळत जा.“ मुलींनीही विचार केला की, ’चला, सावलीत निवार्याला खेळूया. नेहेमी लपाछपी, सागरगोटे खेळणार्या मुलींना नाना दामलेंनी नवीन खेळ, गीते, गोष्टी शिकवल्या. मुलींना त्या गीतांची, खेळांची गोडी लागली. दुसर्या दिवसापासून दररोज मुली समाजकल्याण केंद्रात येऊ लागल्या. तिथे परांजपे, दामले, जोगळेकर या महिला शिक्षिका मुलीची विनाशुल्क शिकवणी घेऊ लागल्या. त्यांना नवनवीन खेळ, गाणी शिकवू लागल्या. मुलींसाठी हे सगळे नवीन आणि छान होते. हे समाजकल्याण केंद्र रा.स्व.संघाच्या जनकल्याण समितीचे संस्कारकेंद्र होते. या मुलींमध्येच एक मुलगी होती, चित्रा घाग आत्ताची चित्रा नलावडे. चित्राच्या आयुष्याला इथूनच कलाटणी मिळाली. आपल्याला जे संचित मिळाले आहे, त्याचा वारसा पुढच्या पिढीलाही मिळावा असा विचार फार कमीजण करतात. इथेच चित्रा घाग-नलावडेंचे माणूसपण उठून दिसते.

 

चित्रा वयाच्या दहाव्या वर्षापासून जनकल्याण समितीच्या संस्कारकेंद्र आणि पुढे अभ्यासिकेत शिकू लागली. अकरावीला असतानाच तिने ठरवले की, आपल्याला जशी जनकल्याण समितीने नवी दिशा दिली, तशी आपणही आपल्या परिसरातील मुलामुलींना दिली पाहिजे. तिने मुलांच्या शिकवणी घ्यायला सुरूवात केली. चित्रा ज्यांची ऐपत आहे, त्यांच्याकडून माफक शुल्क घेऊन आणि ज्यांची ऐपत नाही अशा विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिकवू लागल्या. विद्यार्थ्यांनी नुसते यशस्वी नाही, तर एक माणूस म्हणून यशस्वी व्हावे अशी त्यांची धडपड सुरू झाली. हे करत असतानाच चित्रा संस्कारकेंद्रही चालवू लागल्या. दर रविवारी त्या जनकल्याण समितीच्या तर्फे संस्कार केंद्र चालवू लागल्या. परिसरातील १०० मुले त्यांच्या संस्कारकेंद्रात येऊ लागली. देश, संस्कृती, समाज आणि आपले भारतीय म्हणून असणारे योगदान यावर भर देत चित्रा मुलांवर संस्कार करू लागल्या.

 

मुले निष्ठेचा पाठ गिरवीत मोठी होत होती. यात चित्रा नावाच्या शिक्षिकेचे मौल्यवान कर्तृत्व हे की, या मुलांमधून कितीतरी मुलांनी पुढे आयुष्यात आपल्या सारख्या इतर मुलांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचा निर्धार केला. चित्रा यांच्या संस्कारकेंद्रात शिकणार्या १२ मुलींनी, तर संस्कार क्षेत्रात सेवाव्रती म्हणून काम करायला सुरूवातही केली. सातजणी आपल्या आयुष्यातील इतर व्याप सांभाळून पश्चिम मुंबईमध्ये संस्कारकेंद्र चालवत आहेत. संस्कारकेंद्रांच्या माध्यमातून शेकडो बालकांच्या जीवनात सकारात्मक संस्कृती पेरत आहेत. आज भौतिकतेच्या वावटळीत, जागतिकीरणाच्या रेट्यात संस्कार हे एकअमूल्य संपत्तीआहे. ती मिळवणे महाकठीण झाले आहे. चित्रा यांच्या संस्कारकेंद्रात शिकणार्या मुलींनी संस्कारकेंद्राद्वारे इतर बालकांच्या आयुष्यात संस्कारक्षम जगणे निर्माण केले, हे आज खूप महत्त्वाचे आहे.

 

आजकाल कुणीही कुणावर विश्वास ठेवायला तयार नसतो. ’विश्वास पानीपतच्या युद्धात वारलेहाडायलॉगठरलेला. चित्रा यांनी वस्तीपातळीवर सेवेद्वारे एक आपुलकीचे विश् निर्माण केले आहे. त्यामुळे संस्कार केंद्रातून शिकून गेलेल्या मुलांनी पुढे आयुष्यात काय करावे? इथपासून ते त्यांच्या विवाहाबाबतच्या निवडीपर्यंत चित्रा यांचे मत विचारले जाते. आजच्या जगात हा दुर्मिळ योग. पण हा योग केवळ संस्कार देण्या-घेण्याच्या निर्लोभ प्रक्रियेतूनही साधला जातो, हे चित्रा यांनी दाखवून दिले. “आमची मुले आज योग्य मार्गाला लागलीत, आयुष्यात सज्जन, पापभिरू पण कणखर भारतीय नागरीक झालीत, याचे श्रेय रा.स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या संस्कार केंद्राला आणि चित्रा घाग-नलावडेंना जातेअसे सांगताना शेकडो पालक दिसतात. कालच चित्रा यांना उत्कृष्ट सेवाकार्य केले म्हणून रा.स्व.संघ जनकल्याण समितीचास्व. अप्पा सोहनी पुरस्कारप्राप् झाला. यावर चित्रा म्हणतात,नाना दामलेंची आठवण येते. त्यांनी शिकवलेले की, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असली की असाध्य कार्य साध्य होते. सेवा हे कार्य नाही, तो उपजत मानवस्वभाव आहे. मी ते कायम लक्षात ठेवले. सेवेचा नंदादीप नुसता तेवत ठेवायचा नाही, तर त्यातून नवज्योती तयार होतील यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

सगळ्या जगाला दिप्तीमान करणार्या सूर्याचे कौतूक तर शब्दातीतच आहे; पण आपल्या इवल्याश्या प्रकाशाने अंधाराला पराभूत करणार्या छोट्याशा ज्योतीचेही कौतुक तितकेच शब्दातीत आहे. कारण सूर्य सगळ्यांनाच होता येत नाही, पण सुर्यावरच अवलंबून राहून त्याच्या परिक्रमेनुसार अंधाराचे आवाहन स्वीकारणार्या जगात आपल्या परिमाणात येणार्या अंधाराला विलुप् करणारे खूप कमी असतात. त्यापैकी एक चित्रा नलावडे. ज्यांचे कर्तृत्वच सांगतेमै सूरज ना सही, ज्योतही हूं.

@@AUTHORINFO_V1@@