एकाच घरात आढळले ६ मृतदेह, बुराडीची पुनरावृत्ती?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2018
Total Views |

 
 
हजारीबाग : दिल्ली येथील बुराडी येथे एकाच घरात आढळलेल्या ११ मृतदेहांचे रहस्य ताजे अ,तानाच आता हजारीबाग येथे देखील एक अशीच घटना घडली आहे. एकाच घरातील ६ मृतदेह आढळल्याने हजारीबाग परिसर हादरला आहे. कुटुंबप्रमुखाने घतालीत सदस्यांची हत्या करत स्वत: आत्महत्या केली असल्याची प्रथम शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ६ पैकी ४ मृतदेह फासावर लटकलेले आढळले, तर घरातील मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे, तसेच कुटुंब प्रमुखाने छतावरुन उडीमारुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र मृत्यु संशयास्पद असून यासंबंधी आता पुढे तपास सुरु आहे.
 
ही घटना हजारीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुनागा बागान गार्डन परिसरात घडली आहे. मृत्यू झालेले सर्व एकाच कुटुंबातील असून आई-वडील, मुलगा व मुलगी, नातवंडे यांचा समावेश आहे. घटनास्थळी 'सुसाइड नोट' मिळाले असून यामध्ये आत्महत्येचे कारण तणाव आणि कर्जबाजारी असणे सांगण्यात आले आहे, तसेच 'अमन' ला लटकवणे शक्य नसल्याने हत्या करण्यात आली आहे, असे सागंण्यात आले आहे. 
 
 

 
 
 
कुटुंबप्रमुख नरेश माहेश्वरी यांनी प्रथम त्यांच्या आई, वडील, पत्नी आणि मुलाला फासावर लटकवले. त्यानंतर मुलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर स्वत: घराच्या छतावरून उडी मारली असल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला. तसेच नरेश हे कर्जबाजारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@