विकेंडचा प्लॅन करताय का? मग हे नक्की वाचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मुंबईत दुपारी या मोसमातली सर्वात मोठी हाय टाईड होणार आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थितीमुळे मुंबईसह परिसरात रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. यामुळे विकेंडचा प्लॅन केलेल्यांचा विकेंड पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

@@AUTHORINFO_V1@@